Natasha Poonawalla at Met Gala 2023 Instagram
मनोरंजन बातम्या

Natasha Poonawalla at Met Gala 2023: हा ड्रेस आहे की भलीमोठी बिल्डिंग? ‘मेट गाला’मध्ये नताशा पूनावालाच्या फॅशनची झाली मस्करी

जगातील सर्वात मोठ्या ‘मेट गाला’ या फॅशन प्लॅटफॉर्मवर आलिया डेब्यू करणार असल्याची चर्चेसोबतच नताशा पूनावालाच्या फॅशनचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Natasha Poonawalla Dress: काल रात्री आपण सर्वांनीच ‘मेट गाला’ या फॅशन जगतातील सर्वात मोठ्या शोचा झगमगाट पाहिला. यावेळी अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींसह बॉलिवूड सेलिब्रिटी मेट गालाच्या रेड कार्पेटवर अवतरले. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. या फॅशन शोमध्ये अभिनेत्री आलिया भट पहिल्यांदाच ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर झळकणार होती.

जगातील सर्वात मोठ्या ‘मेट गाला’ या फॅशन प्लॅटफॉर्मवर आलिया डेब्यू करणार असल्याची चर्चेसोबतच नताशा पूनावालाच्या फॅशनचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

नताशा पूनावाला नेहमीच आपल्या हटक्या फॅशन सेन्समुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा ‘मेट गाला’ या फॅशन प्लॅटफॉर्मवरील कलरफुल ड्रेस नेटकऱ्यांना फारच आवडलेला दिसत आहे.

अनेकवेळा नताशा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर ट्रोलही झाली आहे. पण नताशा विचित्र कपडे घालणे काही सोडत नाही. पण यावेळी देखील तिचे जितके नेटकरी कौतुक करत आहेत, त्याहून अधिक तिला ट्रोल करीत आहेत.

यावेळी नताशा ‘मेट गाला’मध्ये सिल्व्हर गाऊनमध्ये दिसली. नताशाचा फ्युटर ड्रेस पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे. यावेळी नताशाने मानेपासून पायापर्यंत सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमुळे बरीच चर्चा होत आहे. (Bollywood)

नताशाचा हा ड्रेस पाहून नेटकरी भरपूर कमेंट करत आहेत. एका युजर म्हणतो, “नताशा, तू तुझ्या फॅशन सेन्सने आम्हाला दररोज आश्चर्यचकित करते.” दुसऱ्या युजरने तिची फॅशन पाहून तिला थेट बॉलिवूडमध्येच काम करण्याचा सल्ला दिली. तर आणखी एक म्हणतो, “ही मेट गाला गर्ल आहे.”

नताशाची विचित्र फॅशनपाहून अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत. एका इंस्टाग्राम युजर्सने लिहिले, “ही कोणती बिल्डिंग आहे? क्रिएटिव्हीटी खूप मस्त आहे.” तर आणखी एक युजर म्हणतो, “तुला चालता येतंय की नाही.” (Trolled)

नताशाबद्दल बोलायचं तर, ती आदर पूनावाला यांची पत्नी आहे. आदर पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ असून त्यांनी अवघ्या भारतासाठी कोविशील्ड नावाची कोरोना लस बनवली होती. आदर आणि नताशाने 2006 मध्ये लग्नगाठ बांधली होती. (Bollywood Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Scam : म्हाडामध्ये मोठा घोटाळा; मास्टरलिस्टमध्ये आढळली १५ बनावट नावे, गाळे बळकावले

Maharashtra Live News Update: जालना रोडवर चारचाकीचा भीषण अपघात

Uttarkashi Cloud burst: ढगफुटीचा कहर! उत्तराखंडमध्ये गावात पूराचा हाहाकार, अनेक घरे जमीनदोस्त|VIDEO

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये वारंवार का होतेय ढगफुटी? उत्तरकाशीमधील व्हिडिओ धडकी भरवणारा

Mumbai-Pune Tourism : वीकेंडला दूर नको; मुंबई-पुण्याजवळच प्लान करा ट्रिप, ५ स्वस्तात मस्त ठिकाणं

SCROLL FOR NEXT