Meghna Erande saam tv
मनोरंजन बातम्या

Meghna Erande : आता 'सनई चौघडे' वाजणार; मेघना एरंडे घेऊन आली नवीन मालिका, महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार 'हे' प्रसिद्ध कलाकार | VIDEO

Meghna Erande New Serial Promo : मराठमोळी अभिनेत्री मेघना एरंडे आता नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. मालिकेचे नाव जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री मेघना एरंडे आपल्या जादूई आवाजासाठी ओळखली जाते.

मेघना एरंडे आता नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मेघना एरंडेच्या नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात ती आईची भूमिका साकारताना दिसत आहे.

प्रेक्षकांसाठी 'झी मराठी' वाहिनी गुडन्यूज घेऊन आली आहे. 'झी मराठी' वाहिनीवर नवीन मालिका सुरू होणार आहे. ज्याचा खास प्रोमो त्यांनी शेअर केला आहे. यात महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून आवाजाच्या दुनियेची क्वीन मेघना एरंडे आहे. मेघना एरंडे धमाकेदार कमबॅक करत आहे. मालिकेच्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवीन मालिकेत मेघना एरंडे जबाबदार आईच्या रुपात पाहायला मिळणार आहे. मालिकेत अभिनेत्री चार मुलींच्या आईची भूमिका साकारणार आहे, जी चांगल्या जावयाच्या शोधात आहे. आता हा शोध कसा असेल, यात काय काय चढ-उत्तार येतील हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे.

मेघना एरंडेच्या नवीन मालिकेचे नाव 'सनई चौघडे' असे आहे. मालिकेच्या प्रोमोच्या व्हिडीओला खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "चार लेकींची ती 'आई', जिची नजर सतत शोधते 'जावई', एखादा चमत्कार घडेल का, दारी सनई चौघडा वाजेल का?"

मालिकेची स्टारकास्ट

'सनई चौघडे' मालिकेत आईच्या भूमिकेत मेघना एरंडे आणि बाबांच्या भूमिकेत सुहास शिरसाट झळकणार आहे. सुहास शिरसाट यांना 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. तर चार मुलींच्या भूमिकेत चार अभिनेत्री झळकणार आहेत. चिन्मयी साळवी, जुई गोगरी, रुची नेरुरकर अशी अभिनेत्रींची नावे आहेत. चिन्मयी साळवी हिला 'वागले की दुनिया' या हिंदी मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. तर मालिकेत मुख्य हिरोच्या भूमिकेत मराठी अभिनेता राज हंचनाळे दिसणार आहे. जो यापूर्वी 'तुझ्यात जीव रंगला' आणि 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकला.

नवीन मालिकेचा प्रोमो पाहून चाहते मालिका पाहण्यासाठी खूपच उत्सुक दिसत आहे. तसेच मेघना एरंडेचे चाहते खूपच खुश आहेत. मात्र अद्याप मालिकेची रिलीज डेट आणि वेळ समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT