MC Stan-Sachin Played Cricket
MC Stan-Sachin Played Cricket Instagram @m_c_stan
मनोरंजन बातम्या

MC Stan's Cricket With Sachin: रॅपर एमसी स्टॅन अन् सचिन तेंडुलकरने लुटला क्रिकेटचा आनंद; व्हिडिओ व्हायरल

Pooja Dange

MC Stan and Sachin Tendulkar Together: 'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅनची तुफान फॅन फॉलोविंग आहे. त्याचे फॅन त्याला पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनच्या फॅनमध्ये आणखी भर पडली आहे. एमसी स्टॅन जिकडे जातो तिकडे त्याची चर्चा असते.

या सगळ्या एमसी स्टॅनने देखील फॅन मोमेन्टचा आनंद घेत आहे. एमसी स्टॅन सचिन तेंडुलकरसह खेळताना दिसला आहे. गुरुवारी एमसी स्टॅनने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये एमसी स्टॅन क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

या दोघांच्या अवती-भोवती खूप गर्दी दिसत आहे. तर एमसी स्टॅन सचिनसाठी बॉलिंग करताना खूप उत्साहित असल्याचे दिसत आहे. तसेच एमसी स्टॅनने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'लगेंट सचिन तेंडुलकरला बॉलिंग करताना. क्रिकेटचा देव, खूप आभार. हक से!!!'

सचिन तेंडुलकर आणि एमसी स्टॅनला एकत्र पाहून फंखूपच खुश झाले आहेत. स्टॅनच्या या पोस्टवर त्याचे फॅन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

एमसी स्टॅनने शेअर केलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहते कमेंट्सद्वारे दोघांचे कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी टेनिस स्टार सानिया मिर्झाने एमसी स्टॅनला महागडे गिफ्ट दिले होते.

रॅपरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून तिचे आभार मानले होते. सानिया मिर्झाने त्याला बालेंसियागा सनग्लासेस गिफ्ट केले होते, ज्यांची किंमत 30,000 रुपये होती आणि Nike शूज देखील भेट दिली आहेत, ज्याची किंमत 91,000 रुपये होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Today's Marathi News Live: शेगाव खामगाव परिसरात मुसळधार पाऊस

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT