Anita Date Lovestory Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anita Date Lovestory: लग्नाआधी एकत्र राहायचे खऱ्या आयुष्यातील हे कपल; 'संस्कारी बहु' अनिता दातेची युनिक लव्हस्टोरी

Anita Date Lovestory: मालिकाविश्वासह खऱ्या आयुष्यात देखील अभिनेत्री अनिता दातेची लव्हस्टोरी खास आहे.

Manasvi Choudhary

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अनिता दाते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अनिता दाते आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. मालिकाविश्वासह खऱ्या आयुष्यात देखील अभिनेत्री अनिता दातेची लव्हस्टोरी खास आहे.

एका लग्नाची तिसरी गोष्ट, दार उघडं ना गडे, मंथन, अनामिका यासांरख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनिता दाते. अनिता दाते मुळची नाशिकची आहे. लहानाची मोठी नाशिकमध्ये झाल्यानंतर अनिता उच्चशिक्षणासाठी पुण्यात होती. पुण्यातील ललित क्रेंद्रामधून तिने नाट्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. येथेच तिची चिन्मयसोबत भेट झाली. दोघांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही नाटकामध्ये अभिनय करायचे .

दरम्यान कॉलेजमध्ये असताना अनिताने कामवाल्या बाया हे नाटक केले होते. हे नाटक बघायला अनिताने खास चिन्मयला बोलावले होते. नाटक बघून चिन्मय प्रभावित झाला. दरम्यान चिन्मयने त्याच्या मनातील भावना अनिताला सांगितल्या. पण त्याला इतक्यात लग्न करायचे नव्हते. तरीही ते एकत्र राहत होते. दीड वर्ष एकत्र राहिल्यानंतर अनिता आणि चिन्मयने लग्नगाठ बांधली.

सध्या अनिता दाते इंद्रायणी या मराठी मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिला खरी प्रसिद्धी 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे मिळाली. तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मिडिया अनिता तिचे फोटो पोस्ट करत असते. अनिताच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत असतो.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT