Matthew Perry Instagram Post Instagram
मनोरंजन बातम्या

Matthew Perry Instagram Post: मॅथ्यू पेरीचा संशयास्पद मृत्यू, अखेरच्या इन्स्टा पोस्टने गूढ वाढलं

Matthew Perry News: मॅथ्यूच्या मृत्यूनंतर त्याची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Matthew Perry Instagram Post

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरी यांचे वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं आहे. 'फ्रेंड्स' या लोकप्रिय वेब सीरीजमध्ये चँडलर बिंगच्या भूमिकेमुळे मॅथ्यूचा जगभरात चाहतावर्ग तयार झाला. मॅथ्यू पेरीच्या अचानक जाण्याने हॉलिवूड सिनेसृष्टीलाच नाही तर त्यांच्या चाहत्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू पेरी शनिवारी लॉस एंजेलिस येथील घरात बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला. मॅथ्यू यांच्या निधनाची बातमी कळताच, पोस्टच्या माध्यमातून चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांची अखेरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

मॅथ्यूच्या मृत्यूनंतर त्याची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टचा आणि मृत्यूचा संबध असल्याचे चाहते बोलत आहेत. दरम्यान, पाच दिवसांआधी मॅथ्यूने एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तो इन्फिनिटी पूलमध्ये गरम पाण्यामध्ये बसलेला दिसून येत आहे. पोस्ट शेअर करताना मॅथ्यूने कॅप्शन दिले की, “अरे, इतकं गरम पाणी आपल्या शेजारी असल्यामुळे बरं वाटतं?, मी मॅटमॅन आहे.” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे. (Social Media)

मॅथ्यू पेरीने १९९०मध्ये प्रदर्शित झालेल्या टेलिव्हिजन कॉमेडी ‘फ्रेंड्स’ या मालिकेमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचे १० वर्ष निखळ मनोरंजन केले होते. मॅथ्यू पेरीने फ्रेंड्स या मालिकेसोबतच, रोम-कॉम, फूल्स रश इन, द होल नाइन यार्ड्ससह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्राइम कॉमेडी द होल नाईन यार्ड्समध्ये त्याने ब्रूस विलिसच्या सोबत स्क्रीन शेअर केली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Chanakya Niti: समोरचा खोटं बोलतोय की खरं कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितले 7 अचूक मार्ग

Tea Mistake: चहा बनवताना या 5 चुका करू नका

SCROLL FOR NEXT