Matka King Review SAAM TV
मनोरंजन बातम्या

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Matka King Public Review : सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या 'मटका किंग' या वेब सीरिजचा पब्लिक रिव्ह्यू जाणून घेऊयात. या सीरिजमध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत झळकला आहे.

Shreya Maskar

'मटका किंग' या वेब सीरिज १७ एप्रिलला रिलीज झाली.

अभिनेता विजय वर्मा 'मटका किंग' सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.

'मटका किंग' हा एक क्राइम ड्रामा आहे.

सोशल मीडियावर सध्या 'मटका किंग' या वेब सीरिजची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. आज जुगार हा फक्त एक खेळ आहे, पण ६० च्या दशकात तो केवळ एक खेळच नव्हता, तर एक व्यवसायसुद्धा होता. त्या दशकातील जुगाराचा बादशाह 'मटका किंग' रतन खत्री यांच्यापासून प्रेरित 'मटका किंग' ही वेब सीरिज आहे. ही सीरिज १७ एप्रिलला प्राईम व्हिडिओवर रिलीज झाली आहे. 'मटका किंग' ही सीरिज नागराज मंजुळे दिग्दर्शित आहे.

'मटका किंग' ची कथा काय?

रतनने अप्रामाणिकपणाच्या वातावरणातही प्रामाणिकपणे जुगाराचा व्यवसाय चालवला, त्याचा विस्तार केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात केला आणि तो यशस्वी झाला. जुगाराचा बादशाह आणि चित्रपट निर्माता रतन खत्री यांच्या आयुष्यावर आधारित 'मटका किंग' सीरिज भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुंबईतील त्यांच्या जुगाराच्या व्यवसायापासून सुरू होते. या मालिकेत विजय वर्मा ब्रिज भट्टीची मुख्य भूमिका साकारतो, जो आपल्या बॉसपासून (गुलशन ग्रोव्हर) वेगळा होऊन मुंबईत स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. पण जेव्हा या व्यवसायातून फारसा नफा मिळत नाही आणि भट्टी बाजारात चेष्टेचा विषय बनतो, तेव्हा त्याला एक वेगळी कल्पना सुचते ती म्हणजे, मटका खेळून लोकांचे नशीब आजमावणे.

जेव्हा जुगाराची मटक्याशी सांगड घातली जाते, तेव्हा ते अधिकच रोमांचक बनते आणि अधिकाधिक लोक त्यात सामील होतात. हे इतके लोकप्रिय होते की शहरांमधील टेलिफोन लाईन्स रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत जाम होतात, इतकेच नव्हे तर पोलिसांनाही फोन करता येत नाहीत. अशाप्रकारे, ब्रिज भट्टीची कल्पना यशस्वी ठरते आणि तो 'मटका किंग' बनतो. ही कथा आणीबाणीच्या काळावर लक्ष केंद्रित करते. ब्रिज भट्टीच्या वैयक्तिक आयुष्याचेही बारकाईने चित्रण करण्यात आले आहे. या सगळ्यात, ब्रिज भट्टी आपला खेळ शेवटपर्यंत टिकवू शकेल का? मटका किंग कायद्याला चकमा देऊन या अवैध खेळावर ताबा मिळवण्यात यशस्वी होईल का? की आणीबाणीमुळे त्याचा खेळ संपुष्टात येईल? हे जाणून घेणे या सीरिजमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे.

'मटका किंग' रिव्हयू

सोशल मीडियावर 'मटका किंग' सीरिजची खूप चर्चा सुरू आहे. लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनुसार 'मटका किंग' चा रिव्हयू जाणून घेऊयात. 'मटका किंग' सीरिज तुम्हाला थेट १९६० च्या दशकातील मुंबईत घेऊन जाते. दिग्दर्शकाने कलाकारांच्या कपड्यांपासून ते टेलिफोन आणि रंगांपर्यंत त्या दशकातील मुंबई पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. सीरिज टप्प्याने हळूहळू उलगडत जाते. सीरिजचे चित्रीकरण प्रेक्षकांना खूप जास्त आवडले. या मालिकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे कलाकारांचा अभिनय. विजय वर्माच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. नेहमीप्रमाणेच, त्याचा नैसर्गिक अभिनय पडदा खिळवून ठेवतो. गुलशन ग्रोव्हरने देखील आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.

कृतिका कामरा आणि सई ताम्हणकर यांनीही आपापल्या भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शिवाय, पत्नी आणि प्रेयसी म्हणून त्यांचे चित्रण प्रभावी आहे. ६० च्या दशकात केवळ एक गृहिणी असण्याचे दुःख आणि स्वतःला वेगळे सिद्ध करण्याची इच्छा या मालिकेत एक सकारात्मक अनुभव देतात. दरम्यान, सिद्धार्थ जाधवने सहाय्यक भूमिकेत आपली छाप सोडली आहे.

उणीव काय?

सोशल मीडियावरील चर्चांनुसार, 'मटका किंग' सीरिज थोडी लांब आहे. प्रत्येक भाग जवळपास ५० मिनिटांचा आहे, ज्यामुळे कथेची गती थोडी मंदावते. मालिकेचा कालावधी जास्त असूनही, रतन खत्री यांच्यापासून प्रेरित असलेल्या पात्राची पार्श्वभूमी पूर्णपणे उलगडली जात नाही, ज्यामुळे तो तसा का बनला हे तेवढे स्पष्ट होत नाही. चित्रपटातील पार्श्वसंगीत आणि गाणी विशेष प्रभावी नाहीत. चांगल्या संगीतामुळे अशा मालिकांची शोभा वाढते. 'स्कॅम १९९८' मध्ये पार्श्वसंगीताने खूप मोठी भूमिका बजावली. त्यामुळे लोक कथेत गुंतून राहिले. त्याचे पार्श्वसंगीत लोकांच्या मनात इतके खोलवर रुजले आहे की, आजही केवळ ते ऐकून ते 'स्कॅम १९९८' मधले आहे हे ते ओळखू शकतात. मात्र 'मटका किंग' मध्ये त्याची उणीव काही प्रमाणात जाणवते.

निष्कर्ष

जर तुम्हाला रेट्रो-थीम, थ्रिलर-रहस्यमय चित्रपट आणि क्राईम ड्रामा आवडत असतील तर 'मटका किंग' पाहण्यासारखा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

Kalyan: अधिकाऱ्यांना मारले, आता ते आम्हाला पण मारतील; फेरिवाल्यांविरोधात कारवाई करा, शिंदेंचे नगरसेवक आक्रमक

SCROLL FOR NEXT