Masterchef India 8 Winner Mohammed Aashiq Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Masterchef India 8'ची ट्रॉफी मोहम्मद आशिकच्या नावावर, ज्यूसच्या दुकानापासून ते मास्टरशेफ होण्यापर्यंतचा असा आहे प्रवास?

Masterchef India 8 Winner Mohammed Aashiq: 'मास्टरशेफ इंडिया' हा शो जवळपास ८ आठवडे चालू होता. या शोचा ग्रँड फिनाले ८ डिसेंबर रोजी पार पडला.

Priya More

Masterchef India 8 Winner:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'मास्टरशेफ इंडिया'चा (Masterchef India 8) ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून यंदाच्या सीझच्या विजेत्याची घोषणा देखील करण्यात आली. कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मोहम्मद आशिकने (Mohammed Aashiq) 'मास्टरशेफ इंडिया ८' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

मोहम्मद आशिकला तब्बल २५ लाखांची रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. मोहम्मदला जेवण तयार करण्याची आवड आधीपासून होती आणि तो कर्नाटकातील (Karnatak) आपल्या गावामध्ये ज्यूसचे दुकान चालवतो. एका गावातून आलेल्या तरूणाने मास्टरशेफ इंडियाची ट्रॉफी जिंकल्यामुळे सर्वस्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मास्टरशेफ इंडिया' हा शो जवळपास ८ आठवडे चालू होता. या शोचा ग्रँड फिनाले ८ डिसेंबर रोजी पार पडला. या शोमध्ये देशभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. 'मास्टरशेफ इंडिया'च्या यंदाच्या सीझनचे जज विकास खन्ना, पूजा धिंग्रा आणि रणवीर बरार हे होते. या शोमध्ये अनेक अडचणींचा सामना करत आणि अथक परिश्रम करत कर्नाटकच्या मोहम्मद आशिकला या शोची ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे. मोहम्मद आशिक हा तरूण फक्त २४ वर्षांचा आहे. या शोची ट्रॉफी जिंकल्यामुळे मोहम्मदला खूप आनंद झाला आहे.

'मास्टरशेफ इंडिया'या शोचा विजेता झाल्यानंतर मोहम्मद आशिकला ट्रॉफीसह २५ लाखांची रक्कम देण्यात आली. या शोच्या शेवटच्या राऊंडमध्ये त्याची स्पर्धा नंबी जेसिका आणि रुखसार सईद यांच्याशी झाली होती. रुखसार या शोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली. दरम्यान, मास्टरशेफ इंडियाचे जज आणि शेफ रणवीर बरार यांनी मोहम्मद आशिकने शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचे अभिनंदन केले.

त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर आशिकसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये की, 'प्रेरणादायी सुरुवातीपासून ते आव्हानात्मक प्रवासापर्यंत, तू कधीच मागे हटला नाहीस आणि आणखी काही करण्याच्या उत्साहात कधीच थांबला नाहीस. मास्टरशेफ झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.'

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आशिक हा कर्नाटकातील मंगलोरचा रहिवासी आहे. आशिकची स्वयंपाकाची आवड त्याला 'मास्टरशेफ इंडिया'मध्ये घेऊन आली. मोहम्मद आशिक आपल्या गावात ज्यूसचे दुकान चालवतो. परंतू मास्टरशेफ झाल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. मोहम्मद आशिकला विश्वास बसत नाही की तो या शोचा विजेता झाला आहे. हे सर्व त्याच्यासाठी एक स्वप्न आहे असं त्याचे म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT