Sayali Sanjiv And Abhinay Berde New Musical Treat Film Instagram
मनोरंजन बातम्या

Sayali Sanjiv News: अभिनय सायलीला म्हणतोय 'ये ना पुन्हा', नेमकं काय आहे प्रकरण?...

संगीताची बहरदार मैफल घेऊन सायली संजीव आणि अभिनय बेर्डे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Chetan Bodke

Sayali Sanjiv And Abhinay Berde New Musical Treat Film: सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांनी बॉलिवूडला धक्का दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती असताना, 'ये ना पुन्हा' या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. संगीताची बहरदार मैफल घेऊन सायली संजीव आणि अभिनय बेर्डे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

प्रेमाला वयाची मर्यादा नसते, लहानपणी आकर्षण वाटत असलेलं प्रेम हे मोठेपणी खऱ्या प्रेमात कसं बदलत जात, आणि त्यासाठी प्रियकर, प्रेयसी कसे जोडले जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'ये ना पुन्हा'. म्युझिकल चित्रपटाला मिळालेली रोमँटिक साथ ही 'ये ना पुन्हा'ला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल यांत शंका नाही. 'ये ना पुन्हा' चित्रपटातून संगीताची बहरदार मैफल घेऊन सायली संजीव आणि अभिनय बेर्डे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

या संगीतमय आणि रोमँटिक चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक तेजस कुलकर्णी यांनी पेलली आहे. या चित्रपटात अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या सोबत समीर धर्माधिकारी, अमोल कागणे, नितीश चव्हाण, आशय कुलकर्णी झळकणार आहेत.

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी निर्माते लक्ष्मण कागणे, किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, सागर पाठक आणि अमोल लक्ष्मण कांगणे यांनी सांभाळली आहे, तर चित्रपटाचे सहनिर्माते निनाद बत्तीन, तबरेज पटेल हे आहेत. तर 'फिल्मस्त्र स्टुडिओ' हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे समोर आले आहे.

या रोमँटिक आणि म्युझिकल प्रेमकहाणीला सुवर्ण पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच सायली संजीव आणि अभिनय बेर्डे यांच्यातील लव्हेबल केमिस्ट्री नेमकी कशी असेल हे पाहणं ही उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT