Marathi Web Film Announcement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Diary Of Vinayak Pandit: अनेक पुरस्कारांची पोचपावती मिळालेला ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ लवकरच रहस्यमय कथा उलगडणार

Diary Of Vinayak Pandit Announcement: ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ या वेबफिल्मचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले असून, लवकरच त्याची प्रदर्शनाची तारीख जाहीर होणार आहे.

Chetan Bodke

Marathi Web Film Announcement: चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत असलेल्या या वेबफिल्मचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर आणि टीमने केले आहे.

पोस्टरमध्ये एक फाशीचा दोर दिसत आहे. हेच रहस्य ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मध्ये उलगडणार आहे. सध्या तरी या चित्रपटातील कलाकार पडद्याआड असले तरी लवकरच ते समोर येतील. आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर यांनी या वेबफिल्मच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शाम करंबळीकर म्हणतात, ‘’या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन जाणारी आहे. विनायक पंडित या एका कलाकाराची जीवन गाथा आणि त्याच्या जवळच्या लोकांचा त्याला असलेला लळा यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवणारा प्रवास आहे.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’भावनिक आणि कौटुंबिक अशी ही वेबफिल्म आहे. कथेची मांडणी अतिशय सुरेख केली असून विचार करायला लावणारा हा विषय आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत. प्रेक्षकांना काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या प्रयत्नात आम्ही नेहमीच असतो. त्यामुळेच असे वेगवेगळे विषय आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत.’’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

Punjab Politics: भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होणार की तुटणार? दोन्ही पक्षातील नेमका तिढा काय?

खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT