Gondhal Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

Gondhal Movie: संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे नाव ऑस्कर २०२७साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून चर्चेत आहे. IFFIतील पुरस्कारानंतर चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shruti Vilas Kadam

Gondhal Movie: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२७साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘गोंधळ’ची निवड झाल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ लोककलेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट संतोष डावखर यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात परंपरा, मानवी नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यांचा वेध घेण्यात आला आहे.

‘गोंधळ’ला यापूर्वीही मोठा सन्मान

‘गोंधळ’ चित्रपटाने यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) संतोष डावखर यांना ‘गोंधळ’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटाच्या कथनशैली, परंपरेचा वापर आणि मांडणीचे ज्युरीकडून कौतुक करण्यात आले.

IFFIच्या अधिकृत माहितीनुसार ‘गोंधळ’ची कथा ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ आणि त्याभोवती घडणाऱ्या नाट्यमय घटनांवर आधारित आहे. चित्रपटात सुमन या महिलेच्या आयुष्यातील संघर्ष, नातेसंबंध आणि स्वातंत्र्याच्या धडपडीची कथा मांडण्यात आली आहे.

मराठी चित्रपटाला जागतिक व्यासपीठ

मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत आशयघन कथा, वेगळे विषय आणि प्रयोगशील मांडणीच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘गोंधळ’ला ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून संधी मिळाल्याची माहिती मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ‘गोंधळ’च्या ऑस्कर प्रवासाकडे आता मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT