Sagar Mukta Sai Relation News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Premachi Goshta Serial: चिमुकल्या सईच्या येण्यानं कोळी कुटुंबीयांच्या चेहेऱ्यावर हसू खुललं; मुक्ता- सागरच्या नात्याला येणार नवं वळण

Premachi Goshta Serial Update: मुक्ता-सागरचं लग्न होऊन अवघे काही दिवसच झाले आहे. त्यांच्या लग्नानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळण मिळालं आहे.

Chetan Bodke

Sagar Mukta Sai Relation News

मुक्ता-सागरचं लग्न होऊन अवघे काही दिवसच झाले आहे. त्यांच्या लग्नानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळण मिळालं आहे. कायमच एकमेकांसोबत वाद घालणाऱ्या कपलमध्ये आता प्रेम खुलताना पाहायला मिळणार आहे. नुकतंच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या समोर आलेल्या प्रोमोममध्ये सागरचं मुक्तावरील प्रेम खुलताना दिसणार आहे. (Tv Serial)

नुकताच मालिकेचा लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो तेजश्री प्रधानच्या फॅन्सक्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, कोळी कुटुंबीय सईच्या येण्याची जोरदार तयारी करीत आहे. आजच्या एपिसोडमध्ये कोळी कुटुंबीयांच्या घरी सईचं आगमन होणार आहे. गेल्या आठवड्यामध्येच कोर्टाकडून मुक्ता आणि सागरला सईची कस्टडी मिळाली आहे. या निर्णयामुळे मुक्ता-सागरसह कोळी आणि गोखले कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर राहत नाही. (Marathi Film)

शेअर केलेल्या या नव्या प्रोमोमध्ये, दोन्ही कुटुंब सईच्या स्वागताची जोरदार तयारी करताना दिसत आहे. हर्षवर्धन-सावनी स्वतः सईला घेऊन कोळी कुटुंबाकडे गेलेले पाहायला मिळत आहे. यावेळी हर्षवर्धनने मुक्ताचा अपमान केला. (Social Media)

तेव्हा सागरने हर्षवर्धनचा चांगलंच समाचार घेतलेला दिसत आहे. प्रोमोमध्ये हर्षवर्धन सागरला बोलतो, "कुठून आला रे तुला हा एवढा ॲटिट्यूड. या मुलीशी लग्न करून?" त्याचं हे वाक्य ऐकून सागर चांगलाच भडकलेला दिसतोय.

"तोंड सांभाळून बोलायचं. बायको आहे ती माझी. मिसेस मुक्ता सागर कोळी. सागर कोळीची बायको आहे." असं म्हणत सागरने हर्षवर्धनची चांगलीच कानउघडणी केली आहे. (Star Pravah)

मुक्ता आणि सागरच्या लग्नानंतर मालिकेला एक नवं वळण मिळालं आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेने टॉप ३ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. सलग दोन ते तीन आठवड्यापासून या मालिकेचा टीआरपी चार्टमध्ये दुसरा क्रमांक पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत, तेजश्री प्रधान, राज हंचाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, ईरा परवाडे, योगेश केळकर, नरेंद्र मधोळकर अशी स्टारकास्ट आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai food: गरम चहा आणि बन मस्का....! मुंबईतील सुप्रसिद्ध इराणी कॅफेंना एकदा भेट द्याच

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Bollywood Actress: एकेकाळी पेट्रोल पंपावर कॉफी विकून ३० रुपये कमावले, आज आहे २०० कोटींची मालकीण

Maharashtra Politics: तानाजी सावंतांवर अजित पवारांचा पलटवार; म्हणाले “विनाशकाले विपरीत बुद्धी”|VIDEO

Bhakri Tips: आगरी स्टाईल भाकऱ्या जमतच नाही? शेकताच कडक होते? १ सोपी टीप, मिनिटात भाकरी तयार

SCROLL FOR NEXT