Jau Bai Gaavat Winner Instagram
मनोरंजन बातम्या

Jau Bai Gaavat Winner: शहरातल्या रमशा फारुकीने जिंकलं बावधनचं मैदान; 'जाऊ बाई गावात'चा थाटात रंगला महाअंतिम सोहळा

Jau Bai Gaavat News: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमधून आलेल्या मुलींनी साताऱ्यातील बावधन गावात चांगलाच धिंगुडशा घातला. ४ डिसेंबर पासून सुरू झालेला हा प्रवास अखेर काल संपला.

Chetan Bodke

Jau Bai Gaavat Winner

झी मराठीवरील 'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमधून आलेल्या ह्या मुलींनी साताऱ्यातील बावधन गावात चांगलाच धिंगुडशा घातला. ४ डिसेंबर पासून सुरू झालेला हा प्रवास अखेर काल संपला.

काल अर्थात ११ फेब्रुवारीला 'जाऊ बाई गावात' या शो चा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोची प्रेक्षकांना विजेताही मिळाली. 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या सीझनची रमशा फारुकी ही विजेती ठरली आहे, तर अंकिता मेस्त्री ही स्पर्धक पहिली रनर अप ठरली आहे. (Tv Serial)

यावेळी सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी आदेश बांदेकर, महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी, कुशल बद्रिकेसोबत झी मराठीवरील नवी मालिका शिवा आणि पारू मालिकेतल्या कलाकारांनीही यावेळी शोमध्ये हजेरी लावली होती.

साताऱ्यातील बावधन गावात 'जाऊ बाई गावात' या शोची शूटिंग पार पडली होती. 'जाऊ बाई गावात' च्या पहिल्या सीझनची विजेती रमशा फारुकी ठरली आहे. यावेळी रमशाला बक्षीस स्वरूपात २० लाख रुपयांचा धनादेश आणि विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली. (Serial)

रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप ५ स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले रंगला. ग्रँड फिनालेमध्ये, अंकिता आणि रमशा या दोघींमध्ये महाअंतिम फेरीत चुरशीची लढत रंगली होती. 'तुझ्यात जीव रंगला' फेम 'राणादा' अर्थात अभिनेता हार्दिक जोशीने या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. (Actress)

विजेती ठरल्यानंतर रमशा फारूकीने प्रतिक्रिया दिली की, "ज्यावेळी माझं नावं विजेती म्हणून जाहीर झालं तेव्हा मला वाटत होतं की मी स्वप्नच पाहतेय. जेव्हा मी विजेती झाली आणि सर्व गावकरी जेव्हा मला मिठी मारायला आले, त्यावेळी मला वाटलं की मी खरंच विजेती झाली. मला या शोने खूप काही शिकायला दिलं. गावकऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला आपलं माणून खूप प्रेम दिलं. मी कायमच बावधन या गावकऱ्यांना मिस करेल." (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT