Sonal Pawar Mehendi Video Instagram
मनोरंजन बातम्या

Sonal Pawar Mehendi Video: 'असा कसा बाई मला तुझा रंग लागला'; ‘रमा राघव’ फेम सोनलच्या हातावर रंगली समीरच्या नावाची मेहंदी

Sonal Pawar Video: ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारच्या घरीही लगीनघाई सुरु आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर मेहंदी समारंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Chetan Bodke

Sonal Pawar Mehendi Video

२०२३ हे वर्ष बऱ्याच मराठी सेलिब्रिटींसाठी खास ठरलं आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक सेलिब्रिटींनी आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. या लिस्टमध्ये आता आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचं नाव जोडले गेले आहे. ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारच्या घरीही लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री सोनल पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर मेहंदी समारंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नोव्हेंबर महिन्यामध्ये, अभिनेत्रीने आणि तिचा होणारा नवरा समीर पालुष्टेने गुपचूप साखरपुडा उरकला होता. तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली होती. काल अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा रंगला. अभिनेत्रीच्या हातावर काढलेल्या नक्षीदार मेहंदीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सोनलच्या हातावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सुद्धा कमालीचं चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर मेहंदी समारंभाचा व्हिडीओ शेअर करताना, “असा कसा बाई मला तुझा रंग लागला”, असं लिहित आणि होणाऱ्या नवऱ्याला टॅग करत सोनलने मेहंदीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये, सोनलने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या हातावर आणि पायावर सुंदर मेहंदी काढलेली दिसतेय. सोनलच्या हातावरच्या मेहंदीमध्ये होणाऱ्या नवऱ्याचं नाव, शिवनेरी बस, मस्तानी आणि मुंबई असं लिहिलेलं दिसतंय.

सोनल आणि समीर येत्या २८ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचे तर, तो एक बिझनेसमॅन असून स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर आणि सीईओ आहे. आणि सोबतच तो डिजिटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो.

सोनल पवारच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती एक फेमस टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातारच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून सोनल पवारला महाराष्ट्राच्या घराघरामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या रमा - राघव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Kalyan Crime : खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला; पोलिसांना वेगळाच संशय

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

SCROLL FOR NEXT