Meera Joshi Accident Instagram
मनोरंजन बातम्या

Meera Joshi Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती...

Meera Joshi Health Update: अभिनेत्री मीरा जोशीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Meera Joshi Car Accident: मराठी सिनेसृष्टीतून एक चिंतेची बातमी समोर येत आहे, एका मराठी टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. अभिनेत्री मीरा जोशीने सोशल मीडियावर तिच्या कारचा अपघात झाल्याची माहिती दिली आहे.

मालिका आणि चित्रपटांतून मीरा जोशी अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण मीरा जोशीबद्दल एक चिंतेची बातमी समोर आली आहे. मीराचा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला असून तिने स्वत:च ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

हा अपघात नेमका कधी झालाय, याची माहिती मिळालेली नाही. गाडीला जबरदस्त फटका बसला असला तरी, तिला फार काही लागलेलं नाही. परंतु तिच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसत आहे. गाडी दुभाजकावर धडकल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अभिनेत्रीने ॲक्सिडेंट झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

मीरा जोशीबद्दल बोलायचे तर, ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मीरा नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो अनेक डान्सचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. मीराने आतापर्यंत अनेक मालिकेंमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT