Tharla Tar Mag  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag Serial: सेलिब्रिटींचं 'ठरलं तर मग'! मीरा जगन्नाथनंतर आणखी एका कलाकारानं सोडली मालिका

Madhav Abhyankar Take Exit From Tharala Tar Mag Serial: मालिका सध्या रंजक वळणावर असतानाच मालिकेतील अजून एका कलाकाराने निरोप घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Madhav Abhyankar Leaves Tharala Tar Mag Serial:

छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रिय आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नेहमीच अव्वल असते. मालिका सध्या रंजक वळणावर असतानाच मालिकेतील अजून एका कलाकाराने निरोप घेतला आहे.

खूप कमी कालावधीत 'ठरलं तर मग' मालिकेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे. घराघरात ही मालिका रोज पाहिली जाते. (Latest Entertainment News)

'ठरलं तर मग' मालिकेतील महिपत ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर लवकरच मालिकेचा निरोप घेणार आहे. मालिकेत माधव अभ्यंकर हे खलनाकाची भूमिका साकारत आहेत. त्यांचा वात्सल्य आश्रमाच्या जागेवर रिसॉर्ट बांधण्याचा प्लॅन आहे. मालिकेत साक्षी हे पात्र साकारणाऱ्या मीरा जगन्नाथचे वडिल दाखवले होते. आता महिपतच्या भूमिकेत अभिनेते मयूर खांडगे दिसणार आहे.

मालिकेतील या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेतील एका कलाकाराने एक्झिट घेतली होती. मालिकेतील साक्षी हे पात्र साकारणाऱ्या मीरा जगन्नाथने मालिकेचा निरोप घेतला होता. मीरा मालिकेत नकारात्मक भूमिकेत होती. मीराच्या जागी आता केतकी पालव ही अभिनेत्री दिसणार आहे.

एकामागोमाग दोन कलाकारांच्या मालिकेतून घेतलेल्या एक्झिटने प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मालिकेतील कलाकार नाराज तर नाही अशा चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT