marathi singer avadhoot gupte wrote a letter to cm eknath shinde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Avadhoot Gupte's Letter to CM : गायक-गीतकार अवधूत गुप्तेचे थेट CM शिंदेंना पत्र; लिहण्यास कारण की...

Eknath Shinde: १९ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असून याबद्दल एक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी अवधुत गुप्तेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Chetan Bodke

Avadhut Gupte: जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो आणि उर अभिमानाने भरुन येतो. आता याच ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्य सरकारकडून राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. १९ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असून याबद्दल एक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी अवधुत गुप्तेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

हे पत्र गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. या पत्रात त्याने लिहिले की, "जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला राज्यगीत म्हणून स्वीकारण्याच्या निर्णयाचे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून प्रचंड कौतुक आणि स्वागत करतो. महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा सार्थ अभिमान या गाण्याच्या शब्दा शब्दात ठासून भरला आहे."

सोबतच पुढे अवधूत गुप्ते म्हणतो, "तो अभिमान केवळ मराठी माणसापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण देशाला, किंबहुना जगाला सुद्धा ऐकू जाईल इतक्या आवाजात, विविध प्रकारे, विविध ठिकाणी, विविध मार्गाने आणि विविध भाषांमधून दवंडी पिटून सांगायला हवा. आता राज्यगीताचा सन्मान राखणं हे बंधनकारक होईल हे स्वागतार्ह परंतु सादरीकरणाच्या नियमावलीमुळे या गीताचा जगभर पसरत असलेला परिमळ उलट प्रतिबंधीत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी."

"काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांनी भारताचा झेंडा फडकवण्याचे नियम शिथिल केल्याने ज्या प्रकारे आता गल्लीबोळात, नाक्यानाक्यावर तिरंगा डौलात फडकवताना दिसतो. त्याचप्रकारे आता हे नवीन महाराष्ट्र राज्यगीत महाराष्ट्राच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सतत ऐकू येवो हीच आई एकवीरे चरणी प्रार्थना." गायक अवधुत गुप्तेची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. राज्यगीत सादर करण्यासाठी असलेल्या नियमावलीमुळे या गीताला राज्यगीत म्हणून घोषित करण्यामागील हेतू अर्धवट राहू नये असं अवधुतने पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT