मराठी मालिका वर्षभरातच संपणार
मुख्य अभिनेत्याने केली भावुक पोस्ट
मालिका संपणार म्हणून चाहते नाराज
स्टार प्रवाह वाहिनीवर एकामागोमाग एक नवीन मालिका सुरू होताना दिसत आहे. मात्र जुन्या लोकप्रिय मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेत आहे, ज्यामुळे चाहते आपल्या लाडक्या मालिकांना निरोप देताना भावुक झाले आहेत. 'तुझ्या सोबतीने' या मालिकेनंतर आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याने एक भावुक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. तसेच मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो देखील समोर आला आहे.
मराठी अभिनेत्री अनुष्का सरकटे, अभिनेता इंद्रनील कामत आणि मिलिंद गवळी मुख्य भूमिकेत असलेली 'वचन दिले तू मला' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचा शेवटचा भाग ११ ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. ही मालिका डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झाली होती. अवघ्या वर्षभरातच मालिकेने आपला गाशा गुंडाळला. मालिका संपणार हे समजताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांना आपलसं केले होते. चाहते आता सर्व कलाकारांना एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
"कालचा शेवटचा दिवस होता, संपला "वचन दिले तू मला" या मालिकेचा प्रवास काल रात्री आम्हा कलाकारांसाठी संपला. एक अध्याय संपला. २८० Episodes पूर्ण करून आम्ही थांबलो. जवळजवळ ११ महिन्याचा हा आमच्या मालिकेचा प्रवास, फारच भारी होता. स्टारप्रवाह आणि सेवेन्थ सेन्स मीडिया ने बनवलेली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. वकिलांचं घराणं असलेल्या जहागीरदार कुटुंबाची ही आगळीवेगळी कथा होती. याच कुटुंबातला मी हर्षवर्धन जहागीरदार एका निष्णात वकिलाचं character गेल्या ११ महिने जगत होतो, या वर्षभरात मला खूप काही शिकायला मिळालं, भारतीय संविधान, फौजदारी कायदा (गुन्हे, शिक्षा), दिवाणी प्रक्रिया (CPC),करार कायदा, मालमत्ता कायदा, कुटुंब कायदा,कंपनी कायदा, कामगार कायदा, पुरावा कायदा IPC ते BNS? CrPC (फौजदारी प्रक्रिया संहिता) होतं, आता BNSS (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता),Evidence Act (पुरावा कायदा) → BSA (भारतीय साक्ष्य अधिनियम).
मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं, मग सोडून दिलं होतं, पण माझ्या नशिबात कायद्याचा अभ्यास होताच आणि तो या मालिकेच्या निमित्ताने गेल्या वर्षात झाला. वडील पोलीस खात्यातून निवृत्त झाले असल्या मुळे घरात वातावरण या विषयाला पोषक होतच. पण खरंच खूप मजा आली ही मालिका करायला आणि हर्षवर्धन जागीरदार सारखं किरदार करायला तर मज्जाच झाली, शशांक सोळंकी चा खूप आभारी आहे, स्टार प्रवाह या वाहिनीचा मी खूप आभारी आहे, आणि इतकी भन्नाट टीम, कलाकार तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करून खूप आनंद झाला. सगळ्यांचा खूप खूप ऋणी आहे आभारी आहे.१५ डिसेंबर २०२५ रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वर सुरू झाली, १६ फेब्रुवारी पासून रात्री १०वाजता प्रसारित व्हायला लागली, मग २७ एप्रिल पासून संध्याकाळी ६.३० वाजता, १० ऑगस्ट असून दुपारी १ वाजता. आणि ११ ऑक्टोबर ला आमची मालिका संपणार. एका छान मालिकेचा छान प्रवास प्रेक्षकांच्या हृदयात घर करून संपला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.