Pinga Ga Pori Pinga  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pinga Ga Pori Pinga : पिंगा गर्ल्सचा स्वॅग लय भारी, पाहा कसा जपणार प्रेरणाचा स्वाभिमान

Pinga Ga Pori Pinga Update : 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पिंगा गर्ल्सच्या साथीने प्रेरणाचा स्वाभिमान जपला जाणार आहे. मालिका कोणते वळण घेणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेने खूप कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीसमोर समीरचे खरे रूप येताच वल्लरीने प्रेरणाला मोलाचा सल्ला दिला होता. इतकेच नसून वल्लरीने प्रेरणाला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त देखील केले. पण आपल्या आई - वडिलांचा विचार करता प्रेरणा कुठल्याही ठाम निर्णयापर्यंत पोहचू शकली नाही.

मालिकेत पिंगा गर्ल्सने मिळून प्रेरणासाठी खास केळवण आयोजित केले. पण, खरा प्रश्न असा आहे की, प्रेरणा समीरला सांगू शकेल का? तिच्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात ती उभी राहील का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. महारविवारच्या भागात प्रेरणाचे वडील समीरला जाब विचारताना दिसणार आहे. त्यावर पुन्हा एकदा समीरच्या स्वभावानुसार तो सगळ्यांच्या समोर प्रेरणावर हात उगारताना दिसणार आहे. तेव्हा मात्र वल्लरीचा राग अनावर होता आणि ती समीरला थांबवते आणि असं केल्यास परिणाम वाईट होतील असं देखील दटावते.

महारविवरच्या भागात प्रेरणा समीरशी लग्न करणार का? हे पाहायला चाहते आतुर आहेत. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेचा महारविवारचा विशेष भाग 16 मार्च रोजी दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. समीरचा रागीट स्वभाव, प्रेरणाला तो देत असलेली वागणूक हे चुकीचे आहे आणि याची जाणीव वल्लरीने प्रेरणाला करून दिली. महारविवारच्या भागात सगळ्यांसमोर समीरचे खरे रूप आल्यावर मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

मुंबईत मोठा भाऊ कोण? जागावाटपावरून महायुतीत तणाव? महापालिकेसाठी मित्रपक्षांचा प्लान की आणखी काही....

तुळजापुरात दोन गटात तुफान राडा; भाजप आणि मविआमधील नेत्यामध्ये हाणामारी |Video Viral

Bhakri Tips: नाचणीची भाकरी लाटताना कटा फुटतात? या सोप्या टीप्सने होईल अगदी गोल भाकरी

SCROLL FOR NEXT