Marathi Serial: मराठी मालिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवीन मालिका आता प्रेक्षकांच्या संतापाचा विषय बनली आहे. सन मराठी वाहिनीवर रात्री ९:३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या प्रोमोवर सोशल मीडियावरून प्रचंड रिऍक्शन येत असून नेटकऱ्यांनी मालिकेवर टीका केली आहे.
मालिकेतील प्रमुख पात्रांमध्ये दीप्ती केतकर (अनुप्रिया) आणि हरीश दुधाडे (अविनाश) दृश्य न पटणारे आहेत. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये एका दृश्यात अविनाश आपल्या पत्नी अनुप्रियाला रागात जबरदस्तीने टोपभर बासुंदी प्यायला लावतो, तर दुसऱ्या सीनमध्ये आजारी वडिलांना भेटायला गेली म्हणून तो अनुप्रियाच्या कपाळावर “निर्लज्ज” असा शब्द स्केच पेनने लिहितो. हे दृश्य अनेक प्रेक्षकांना अतिशय अस्वस्थ करणारे आहे.
सोशल मीडियावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. एकाने कमेंट्समध्ये लिहीले, “आजच्या काळात हे काय दाखवताय, अतिरेक होतोय” तसेच आणखी एकाने लिहीले, “ही मालिका बंद करा, टीआरपीसाठी काहीही दाखवू नका” असे म्हणणारे नेटकरी दृश्यांवर संताप व्यक्त करत आहेत. काहींनी तर मालिकेला “फालतू” आणि “विकृतपणाचा कळस” असे देखील म्हटले आहे.
अशा हिंसक किंवा अतिआघे-पार दाखवलेल्या प्रसंगांमुळे सामाजिक दृष्टिकोनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि वास्तव आयुष्यातील नात्यांवरही चुकीचा प्रभाव पाडू शकतो. टीआरपी वाढवण्यासाठी मालिकांमध्ये अतिरेक दाखविण्याची प्रवृत्ती काही प्रेक्षकांना मान्य नसल्याचेही व्यक्त झाले आहे. एकूणच, ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेच्या प्रोमोवर आलेल्या प्रतिक्रियांमुळे निर्मात्यांना त्याच्या कथानकाची दिशा पुन्हा विचारात घ्यावी लागण्याची गरज प्रेक्षकांनी मांडली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.