Lai Avadtes Tu Mala SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lai Avadtes Tu Mala : सानिका उचलणार महिला सक्षमीकरणाचे पहिलं पाऊल, गावात नेमकं काय घडणार?

Lai Avadtes Tu Mala Update : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत आता सानिका महिला सक्षमीकरणासाठी गावातील महिलांना रोजगार मिळवून देत आहे. ही मालिका अधिक मनोरंजक होत जात आहे.

Shreya Maskar

दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो. हा दिवस महिलांना गौरवण्याचा आणि त्यांच्या यशाचे, कामाचे कौतुक करण्याचा असतो. आजच्या महिलेने आकाशाला गवसणी घातली आहे. प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक गोष्टीत महिला या आघाडीवर आहेत. महिला सक्षमीकरणाचे (women empowerment) अनेक उपक्रम राबवले जातात. तसेच याचे महत्त्व अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि मनोरंजनाच्या क्षेत्राच्या माध्यमातून जगापर्यंत पोहचवले जातात.

सध्या 'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala) प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत सानिका संपूर्ण गावाला रोजगार मिळून देण्याचा धाडसी निर्णय घेणार असून त्याची सुरुवात महिलांपासून करणार आहे. स्त्री-सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल घेताना दिसणार आहे. सानिकाला गूळ उत्पादनाचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचते आणि ती गावातील महिलांना सक्षम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार करते. गूळ बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये आलेल्या अडचणींवर मात करत सानिका अखेर यशस्वी होते.

सानिकाच्या गूळ उत्पादनाचा व्यवसायमुळे गावातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याचा मार्ग खुला होतो. मात्र सई आणि इतर काही जणांच्या कारस्थानांमुळे सानिकाच्या मार्गात अडथळे येत आहेत. तरीही सानिकाच्या धैर्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने ती या सर्व अडचणींवर मात करताना दिसत आहे.

महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना सानिका मोजार म्हणाली की, "एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या सगळ्या सुपर वुमन्सना माझा सलाम. माझ्यासाठी माझी आईच माझी इन्स्पिरेशन आहे. सगळ्याच स्त्रिया स्वतः आधी इतरांना ठेवतात. इतरांच्या सेवेत त्या स्वतः च्या आशा आकांक्षा बाजूला ठेवतात. त्यांचे स्वतः साठी जगणे राहून जाते. पण स्त्रियांनी स्वतःला न विसरता स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला हवा म्हणजे स्वतः त्या आणि त्यांच्या आयुष्यातील सगळेच खुश राहू शकतील. अगदी अशी मालिकेतील सानिका आहे. मालिकेत आम्ही तसंच दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे. महिलांनी स्वतः च्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे, त्यांनी स्वतःचा देखील विचार केला पाहिजे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT