Delivery Boy Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Delivery Boy Teaser: हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परबच्या 'डिलिव्हरी बॉय'चा धमाकेदार टीझर रिलीज

Priya More

Hruta Durgule And Prathamesh Parab:

मराठी सिनेसृष्टीची (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गळे (Hruta Durgule) आणि सर्वांचा लाडका दगडू अर्थात प्रथमेश परब लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृता आणि प्रथमेशच्या 'डिलिव्हरी बॉय'ची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे भन्नाट पोस्टर रिलीज करण्यात आले होते. आता या चित्रपटाचा टीझर (Delivery Boy Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा धमाकेदार टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना 'सरोगसी'साठी तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यातून होणारा कल्लोळ आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत? याचे उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक बरोबर अंकिता लांडेही प्रमुख भूमिकेत दिसत आहे. 'डिलिव्हरी बॉय'मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटातील त्याचा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडत आहे.

हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा असल्याचे आपल्याला टीझरवरून कळालेच असेल. आता प्रथमेश परब आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो, हे आपल्याला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल. पण टीझरवरून हा चित्रपट बघताना प्रेक्षकांना धमाल येणार हे दिसून येत आहे.

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत. तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. प्रथमेश आणि हृता यांचा हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच रिलीज झालेला टीझर पाहून प्रेक्षक चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT