Chukbhul Dyavi Ghyavi Marathi Play Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

Chukbhul Dyavi Ghyavi Teaser: २५ वर्षे जुनं ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ नाटक नव्या रुपात रंगभूमीवर येणार, धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Chetan Bodke

Chukbhul Dyavi Ghyavi Teaser

सध्या मराठी प्रेक्षकांमध्ये, मराठी नाटकांचं फार मोठ्या प्रमाणात फॅड पाहायला मिळत आहे. सध्या अनेक नाटकांची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकातील अक्षया नाईकचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. या नाटकाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड होत असताना, अशातच चित्रपटातील दुसरं पात्रही समोर आलं आहे. सोशल मीडियावर नाटकाचा टीझर प्रदर्शित झाला असून नाटकाची तुफान चर्चा होत आहे. नाटकामध्ये अक्षयाच्या पतीचे पात्र अक्षय मुडावदकर साकारत असून या नव्या जोडीची सध्या प्रचंड चर्चा होत आहे.

ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांचं हे नाटक असून तब्बल २५ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. अभिनेता अक्षय मुडावदकर आणि अभिनेत्री अक्षया नाईकची ही नवी जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच रंगभूमीवर एकत्र पाहता येणार आहे. अक्षया नाईकचा नाटकातला लूक गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. अशातच अभिनेता अक्षय मुडावदकरचा नाटकातील पहिला लूक, नाटकाचं नाव जाहीर झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाटकाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला रंगभूमीवर येणार आहे.

शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, अक्षयासोबतच अक्षयही दिसून येत आहे. नेहमीच तुमच्यामुळेच उशीर होतो, असं म्हणत दोघांचंही हलकंफुलकं मनोरंजन करणारं पात्र दिसून येत आहे. दोघेही तुझ्यामुळेच उशीर होतो, असं म्हणत एकमेकांवर खापर फोडताना दिसत आहे. फुल्ल टू मनोरंजन असलेल्या या नाटकाचा टीझर प्रचंड चर्चेत आला आहे. या नाटकाचा टीझर अभिनेत्री अक्षया नाईकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली असून केतकी प्रवीण कमळे यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. अशोक पत्की यांनी नाटकाचं संगीत, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन, तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांनीही नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारली.

पंचवीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर प्रदर्शित झालेल्या ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. अतिशय हलकंफुलकं मनोरंजक ठरलेल्या या नाटकाला फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, समीक्षकांकडूनही आणि मराठी सेलिब्रिटींकडूनही नाटकाचे कौतुक झालं होतं. पुन्हा एकदा तोच मनोरंजक अनुभव नव्या रुपात देण्यासाठी या नाटकाची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. कसदार लेखनाला उत्तम अभिनयाची साथ असल्यानं हे नाटक रसिकांचं नक्कीच पुरेपुर मनोरंजन करेल यात शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT