Satyashodhak Film  Instagram
मनोरंजन बातम्या

Satyashodhak Movie: ‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या (Maharashtra Government) या निर्णयाचे सर्वस्तरावरून कौतुक केले जात आहे.

Priya More

Satyashodhak Movie Tax Free:

क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपटाबाबत (Satyashodhak Movie) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या (Maharashtra Government) या निर्णयाचे सर्वस्तरावरून कौतुक केले जात आहे. या निर्णयामुळे चित्रपटाच्या टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

'सत्यशोधक' हा चित्रपट देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत आहे. चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या १८ टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी ९ टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असतो. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची करसवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक कार्य भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन, छगन भुजबळ यांनी केले आहे.

दरम्यान, समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत. सत्यशोधक या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे या सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Budh Shukra Yuti: 5 वर्षांनंतर एकत्र येणार बुध-शुक्र; दोन्ही ग्रहांच्या युतीनंतर 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Viral Video : धावत्या स्कुटीवर विजेचा खांब पडता पडता राहिला, महिला थोडक्यात बचावली, घटना CCTV मध्ये कैद

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

SCROLL FOR NEXT