Boys 4 Title Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boys 4 Title Song Out: अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या आणि कबीरचं गायन क्षेत्रात ठेवलं पाऊल, 'बॉईज ४'चं टायटल सॉन्ग रिलीज

Boys 4 Title Song: या गाण्याच्या माध्यमातून पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे यांनी अभिनयानंतर आता गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

Priya More

Boys 4 Movie:

ढुंग्या, धैऱ्या आणि कबीर हे त्रिकुट पुन्हा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’नंतर लवकरच ‘बॉईज ४’ (Boys 4 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणं खुद्द ढुंग्या, धैऱ्या आणि कबीर यांनी गायलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे यांनी अभिनयानंतर आता गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्यांच्या चित्रपटाचं हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.

'बॉईज'च्या सर्व भागांना अवघ्या महाराष्ट्रातून प्रेम मिळाले. धैर्या, ढुंग्या आणि कबीर हे त्रिकुट आता चौपट धमाल घेऊन 'बॉईज ४'च्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील 'टायटल सॉन्ग' रिलीज करण्यात आले. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे रॅप सॉन्ग अवधूत गुप्ते यांच्यासह प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि पार्थ भालेराव यांनी गायले आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने आता हे त्रिकुट गायकही बनले आहे.

अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत लाभलेल्या या गाण्याला हृषिकेश कोळी यांनी शब्दबद्ध केले आहे. यापूर्वीही बॉईजच्या प्रत्येक भागातील गाण्यांनी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावले होते. आता हे टायटल सॉन्गही तरुणाईला भुरळ घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धैर्या, ढुंग्या आणि कबीर या गाण्यातही धमाल करताना दिसत आहे. या गाण्यातून त्यांचा अनोखा स्वॅग सर्वांना पाहायला मिळत आहे. हे जबरदस्त गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

दरम्यान, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मिती केली आहे. विशाल सखाराम देवरूखकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर हृषिकेश कोळी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. २० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील हे मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार मौन आंदोलन

Budget international travel: बजेट कमी आहे? नो टेन्शन! या ठिकाणी करून शकता इंटरनॅशल ट्रिप

Labour Code Explained: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार, Full & Final आणि कर्मचाऱ्यांचे हक्क एका क्लिकमध्ये समजून घ्या

Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे

शेतकरी कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, बँक खात्यात कधीपर्यंत येणार पैसा? सरकारनं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT