अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि आता उद्योजक अशा बहुआयामी अभिनेत्याचा आज वाढदिवस. महेश मांजरेकरांनी मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या कामाची छाप पाडली आहे. महेश मांजरेकर नेहमीच आपल्या धाडसी आणि बेधडक स्वभावासाठी चर्चेत असतात.
महेश मांजरेकरांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एका प्रसंगात जीवनमरणाची लढाई लढावी लागली होती. महेश मांजरेकरांचे धाडसी व्यक्तिमत्तव ते कर्करोगासारख्या आजाराशी झुंज हा त्यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरलाय. महेश मांजरेकर आज ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही रोचक गोष्टी जाणून घेऊया...
सलमान खानच्या 'अंतिम' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान महेश मांजरेकरांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. कर्करोगासारख्या आजाराचे निदान झाल्यावरही त्यांनी त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊन दिला नाही. शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधीपर्यंत त्यांनी 'अंतिम' चित्रपटावर काम केले. कर्करोगाचा त्रास होत असतानाही बिग बॉसच्या ३ पर्वाचा प्रोमो शुट केला होता. त्यादरम्यानचा अनुभव त्यांनी शेअर केला.
'बिग बॉस मराठी ३' पर्वाचा प्रोमो शुट झाला तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. शुटिंगच्यावेळी मला प्रचंड वेदना होत होत्या. तरीही मी जिद्दीने आणि प्रामाणिकपणाने शुटिंग पूर्ण केले. शुटिंगवेळी माझ्या शरिरात अनेक ठिकाणी नळ्या लावल्या होत्या. या नळ्या कॅमेरात दिसू नये यासाठी मी खूप प्रयत्न केले.
मी गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे शुट मला पूर्ण करायचे होते. मला ज्या वेदना होत होत्या त्याबद्दल माझी काहीच तक्रार नव्हती'. असे महेश मांजरेकरांनी एक पत्रकार परिषदेत सांगितले होते.
सलमान खानने दिला होता सल्ला
महेश मांजरेकर आणि सलमान खानची मैत्री तर सगळ्यांनाच माहित आहे. महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच त्याने त्यांना परदेशात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. पण महेश मांजरेकरांनी भारतात उपचार घेण्याचे ठरवले. मुंबईतील डॉक्टरांवर माझा विश्वास आहे. असा विश्वास महेश मांजरेकरांनी दाखवला.
तर महेश मांजरेकर आता कर्करोगमुक्त झाले आहेत. महेश मांजरेकरांच्या या संघर्षाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. अशा लढवय्या अभिनेत्याचे कायमच चाहते कौतुक करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.