Dharmaveer 2 Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 Announcement: ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर येतोय ‘धर्मवीर २’; खंडोबाच्या चरणी लीन होत निर्मात्यांनी केली घोषणा

Dharmaveer 2 Announcement: धर्मवीरच्या या दिमाखदार यशानंतर जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन 'धर्मवीर २'ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.

Chetan Bodke

Dharmaveer 2 Film: स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरला. धर्मवीरच्या या दिमाखदार यशानंतर जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन ‘धर्मवीर २’ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मवीर २’ ची चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा केवळ चर्चा न राहता आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे. साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती . ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेच ‘धर्मवीर २’ चे लेखन, दिग्दर्शन करणार असल्यानं हा चित्रपटही दमदार होईल यात शंका नाही.

पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर २’ "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा चित्रपट असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ‘धर्मवीर २’च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT