Marathi Movie Chowk Teaser Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie Chowk Teaser: वाघ आहे वाघ! 'चौक'चा टीझर पाहिला का? येईल 'मुळशी पॅटर्न'ची आठवण

Chowk Teaser Out: चौकचा टीझर प्रदर्शित होताच काही तासात सर्वत्र व्हायरल झाला आहे.

Pooja Dange

Pravin Tarade Upcoming Movie Chowk Teaser Out: सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चौकचा टीझर प्रदर्शित होताच काही तासात सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

टीझरची सुरूवातच खूप गर्दीने होते. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटाची निर्मितीमूल्य या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतात.

याशिवाय टीझरमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील. यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार हे नक्की! (Latest Entertainment News)

टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे संवादांनी... सुरवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे वाघ’ हा संवाद असो किंवा टीझरच्या शेवटी किरणचा ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ हा संवाद असो, यावरून असं लक्षात येतंय की अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी लेखन, संवाद, कथा, पटकथा या सर्वच पातळ्यांवर बाजी मारली आहे.

चौकच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रविण तरडेंची खास शैली, रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांची वेगळी भूमिका, उपेंद्र लिमयेंचा रांगडा अभिनय, स्नेहल तरडे व संस्कृती बालगुडे यांच्या संवेदनशील भूमिका आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळतील. तर, किरण गायकवाड चौकमध्ये तरूणाईचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय.

चौकच्या निमित्ताने किरण प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच वेगवेगळ्या बाजूंनी एकाच चौकात आलेले हे सर्व कलाकार आपल्यासमोर नक्की काय घेऊन येत आहेत, हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. टीझरमध्ये वाजणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे देखील हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT