Pushkar Jog On Mumbai Pits Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai Road Potholes: रस्त्यांवर खड्डे आहेत की आपण सगळे खड्ड्यात..., मराठमोळ्या अभिनेत्याची मुंबईच्या रस्त्यांबद्दल संतप्त पोस्ट

Pushkar Jog On Mumbai Road Pits: मराठमोळ्या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मुंबईतल्या खड्ड्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

Chetan Bodke

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. कोणताही ऋतु असो, कायमच खड्ड्यांचा मुद्दा चर्चेत असतो. पावसाळ्यात मुंबईकरांसह राज्यातील इतर नागरिकांनाही आपल्या शहरात खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा राज्यातील नागरिकांचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव जातो किंवा दुखापतही होते. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने पोस्ट शेअर करत मुंबईतल्या खड्ड्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता पुष्कर जोग कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो. कायमच पुष्कर सामाजिक मुद्द्यांवर बिनधास्त पोस्ट शेअर करत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. तो उत्तम अभिनेता असून त्याच्या स्पष्टवक्तेपणाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. पुष्करने नुकतीच एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने समाजातील विविध गोष्टींबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

इन्स्टा स्टोरीवर पुष्करने लिहिलंय की, “दरवर्षी तेच तेच… रस्त्यांवर खड्डे आहेत की आपण सगळे खड्ड्यात… याचा सुद्धा सर्व्हे झाला पाहिजे ना? नाही नाही आपण काहीच बोलायचं नाही… आपण फक्त अवाढव्य टॅक्सेस भरत राहायचं #जोगबोलणार… माणसांचा, लहान मुलांचा आणि महिलांचा जीव महत्त्वाचा आहे की नाही?” अशी पोस्ट अभिनेत्याने शेअर केलेली आहे. अभिनेत्याचीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Pushkar Jog Mumbai Pits Post

पुष्कर जोगबद्दल सांगायचं तर, २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘जबरदस्त’ चित्रपटामुळे अभिनेता पुष्कर जोग घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने सिनेकरियरमध्ये अनेक मराठी चित्रपटांतून चाहत्यांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यासोबतच पुष्कर जोगच्या ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमामुळेही घराघरांत लोकप्रिय झाला.

पुष्करने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वीच पुष्कर जोगचा पुजा सावंत स्टारर ‘मुसाफिरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पुष्कर जोग एक प्रसिद्ध अभिनेता असून प्रसिद्ध दिग्दर्शकही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT