Sachin-Supriya Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sachin-Supriya Dance : "जहां मैं जाती हूँ.." सचिन - सुप्रियाचा रोमॅटिंक अंदाज, व्हिडीओ पाहिलात का?

Sachin And Supriya Pilgaonkar Romantic Dance Video: सचिन आणि सुप्रियाने "जहां मैं जाती हूँ वहीं चले आते हो" या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

Manasvi Choudhary

मराठी मनोरंजनविश्वातील सुप्रसिद्ध जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात हे दोघे असणार आहेत. २० सप्टेंबरला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. अशातच सचिन आणि सुप्रिया यांच्या केमेस्ट्रीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सचिन पिळगांवकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये या कपलने "जहां मैं जाती हूँ वहीं चले आते हो" या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यातील त्यांच्या रोमॅटिंक अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. १९५६ मध्ये रिलीज झालेल्या चोरी चोरी चित्रपटातील हे गाणं आहे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे.

सचिन पिळगांवकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.दोघांचाही रोमॅटिंक अंदाज नेटकऱ्यांच्या पंसतीस आला आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

आगामी काळात ही जोडी नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार हे दिग्गज कलाकार मंडळी असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT