Ved Movie Box Office Collection Update Instagram @riteishd
मनोरंजन बातम्या

Ved Box Office Collection: 'वेड'ची सुसाट कामगिरी, शाहरुखच्या 'पठान'पुढे ही वेड कायम...

'पठान' मुळे इतर सिनेमांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण रितेश देशमुखचा वेड मात्र पठानला कडवी टक्कर देतोय.

Chetan Bodke

Ved Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट आपले वर्चस्व गाजवत आहे. गेल्या वर्षी 'वेड' चित्रपट प्रेक्षकगृहात प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर आपली दमदार छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. शाहरुख खानचा पठान सिनेमा देखील प्रदर्शित होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. देशभरात पठानची जोरदार हवा आहे. कदाचित, 'पठान' मुळे इतर सिनेमांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण रितेश देशमुखचा वेड मात्र पठानला कडवी टक्कर देतोय.

'वेड'ने आता पाचव्या आठवड्यात आपली दमदार एन्ट्री केली आहे. चित्रपटाने पाचव्या आठवड्यात शुक्रवार पर्यंत तब्बल ५७ कोटींची कमाई केली आहे. 'वेड' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर, विकेंडमध्ये एकूण ४ कोटींची कमाई केली.'वेड'चे पाचव्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस कलेक्शन नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सोमवारी ५२ लाख , मंगळवारी ४१ लाख, बुधवारी २१ लाख आणि गुरुवारी ५५ लाख आणि शुक्रवारी २४ लाख अशी कमाई केली. त्यामुळे वेड ने आतापर्यंत एकूण ५७.१५ कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे 'पठान'च्या समोर 'वेड'थिएटरमध्ये ठाण मांडून बसला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून 'वेड'नं बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम दाखवली.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला होता. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई पूर्ण केली होती.

'वेड' हा सिनेमा नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या 'मजिली' या तेलुगू सिनेमावर आधारित आहे. हा चित्रपट जरी रिमेक असला तरीही रितेश आणि जिनिलियाला या चित्रपटातून खुपच पसंदी मिळत आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रितेश- जिनिलिया सोबत 'वेड'मध्ये जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT