Ole Aale Film In Nana Patekar And Makarand Anaspure Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ole Aale Film: नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र

Ole Aale Film: अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा 'ओले आले' हा चित्रपट येत्या ५ जानेवारीला चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nana Patekar And Makarand Anaspure New Film

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून नाना पाटेकरांची ओळख आहे. नाना पाटेकर नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच त्यांचा 'ओले आले' हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे चित्रपटात नान पाटेकरांचे मित्र आणि उत्कृष्ट अभिनेते मकरंद अनासपुरे दिसणार आहेत.

चित्रपटात नाना पाटेकर एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत सुरू आहे. या प्रवासात पण मकरंद अनासपुरे सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही जोडी 'ओले आले' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आपल्या अभिनयाचे आणि विनोदाचे प्रेक्षकांचे मनोरंजन करायला नाना आणि मकरंद अनासपुरे सज्ज आहेत. चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. (Marathi Film)

'ओले आले' चित्रपटात 'व्यस्त रहा.. पण मस्त रहा..' असं म्हणणारे नाना सिद्धार्थला जगण्याचे मंत्र सांगताना दिसत आहेत. खरं तर हा मूलमंत्र ते स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, कधी प्रेमाने तर कधी हट्टाने मुलाला शिकवू पाहताहेत. बाबा आणि मुलाच्या या मजेशीर प्रवासात मकरंद अनासपुरे देखील सामील झालेले दिसणार आहेत. आपलं आयुष्य आनंदी, समाधानी असावं असं म्हणणारे मकरंद अनासपुरे या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक झालेले आहेत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची ही मजेशीर जोडगोळी 'ओले आले' मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT