Priya Bapat Felicitate In Special Award Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Bapat News: ‘‘हा’ पुरस्कार स्विकारताना मन भरून आलं...’; ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’मध्ये प्रिया बापटला विशेष पुरस्काराने सन्मानित

Priya Bapat Got Special Award: अभिनेत्री प्रिया बापटने बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीसह ओटीटी माध्यमांवर, नाट्यसृष्टीमध्ये आणि टेलिव्हिजन सृष्टीमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Chetan Bodke

Priya Bapat Felicitate In Special Award

अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या कामामुळे प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरली आहे. प्रियाने बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीसह ओटीटी माध्यमांवर, नाट्यसृष्टीमध्ये आणि टेलिव्हिजन सृष्टीमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिटी ऑफ ड्रीम्स (City Of Dreams) या वेब सीरिजमधून प्रियाने ओटीटी विश्वात पाऊल ठेवलं. तिने या वेबसीरिजमध्ये पोर्णिमा गायकवाड नावाचे पात्र साकरले. नुकतंच प्रियाला ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’मध्ये एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दलची पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (Marathi Actress)

नुकतंच हा पुरस्कार सोहळा पार पडला. आज अर्थात १६ मार्चला ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ प्रेक्षकांना झी मराठीवर पाहता येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियाला तिच्या कामगिरीसाठी एक खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘मराठी पाऊल पढते पुढे’ या श्रेणीमध्ये अभिनेत्रीला गौरविण्यात आले आहे. पुरस्कार स्विकारतानाची पोस्ट शेअर करताना तिने चाहत्यांसह, दिग्दर्शकांचे, निर्मात्यांचे, कलाकारांचे तिने आभार मानले. (Marathi Film)

प्रिया बापट आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “ “मराठी पाऊल पडते पुढे” आपल्या यशाचं कौतुक होत, पण तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाला शाबासकी मिळणं हे जास्त स्पेशल आहे. आपल्या कष्टांची, मेहनतीची दखल घेऊन त्यातून मिळवलेल्या यशाबद्दल उभ्या महाराष्ट्राला अभिमान वाटणं हे खूप मानाचं आहे. आज हा पुरस्कार स्विकारताना मन भरून आलं. माझा अभिनेत्री म्हणून आजपर्यंतच्या प्रवासातले सगळे दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, विद्या ताई सर्वांना खूप खूप धन्यवाद.” (Social Media)

अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलते, “झी मराठीने दिलेल्या ह्या मानासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मोठी झेप घेऊ पाहणाऱ्या माझ्या पंखांना बळ देणाऱ्या आई- वडिलांना नमस्कार. माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास दाखवून मला नवं आकाश खुलं करून देणाऱ्या नागेश कुकनूर यांना मनःपूर्वक धन्यवाद. श्वेता तुला खूप खूप प्रेम, मुकुंद मेन्शन माझं कुटुंब आहे आणि राहील. आणि कायम माझ्यासोबत, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रेम करणारा उमेश कामत. उमेश लव्ह यू....” असं अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते. शेअर केलेल्या पोस्टवर प्रियाच्या चाहत्यांसह तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Award)

प्रियाने बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीसह ओटीटी माध्यमांवर, नाट्यसृष्टीमध्ये आणि टेलिव्हिजन सृष्टीमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'वजनदार', 'टाइमपास २', 'आंधळी कोशिंबीर', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटांतून प्रियाला विशेष ओळख मिळाली. तर तिने 'लगे राहो मुन्ना भाई' आणि 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस' या हिंदी चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच 'रात जवान हैं' या वेबशोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT