Aaipan Bhari Deva Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aaipan Bhari Deva: 'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर आता 'आईपण भारी देवा', जागतिक महिला दिनी केदार शिंदेंची घोषणा

Baipan Bhari Deva: २०२३ हे वर्ष बॉक्सऑफिसवर गाजवल्यानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आज जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) दिवशी या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Priya More

Aaipan Bhari Deva Movie:

'बाईपण भारी देवा'च्या (Baipan Bhari Deva Movie) ब्लॉकबस्टर यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदेची जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 'आईपण भारी देवा!' (Aaipan Bhari Deva Movie) असं या चित्रपटाने नाव आहे. २०२३ हे वर्ष बॉक्सऑफिसवर गाजवल्यानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आज जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) दिवशी या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत केदार शिंदे यांनी 'आईपण भारी देवा' या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

'आईपण भारी देवा' या चित्रपटाबाबतची इतर माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत या चित्रपटामध्ये कोण-कोण कलकार दिसणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण याची माहिती देखील अद्याप सांगण्यात आली नाही. मागच्या वर्षी 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी गाजवली होती. महाराष्ट्राबरोबर परदेशातही या चित्रपटाचं यश साजरं करण्यात आलं होतं. या चित्रपटाने प्रत्येक घराघरात, प्रेक्षकांच्या मनात एक विशेष आणि जिव्हाळ्याची जागा निर्माण केली होती. आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला. अजूनही प्रेक्षक या चित्रपटाची आणि कलाकारांचे कौतुक करताना दिसतात.

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर 'आईपण भारी देवा' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’ ' त्यांच्या या पोस्टला पसंती देत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले की, 'बाईपण भारी देवा या चित्रपटाने खूप काही शिकवलं. खरतर प्रत्येक कलाकृती आम्हा कलाकारांसाठी एक कार्यशाळा असते. पण बाईपण भारी देवा चित्रपट करताना आणि नंतर प्रदर्शित झाल्यावर रसिकांच्या प्रतिसादाने भारावलेपण आलं होतं. ही कलाकृती मी माझ्या आई, बायको, मुलगी, मावशी, आजी... यांच्यासाठीच केली होती. 'अगं बाई अरेच्चा' ने स्त्रीच्या मनात काय चालतं? याचा शोध घेतला, बाईपण भारी देवाने स्त्री मनाला समजून घेण्याची संधी मिळाली. या यशाने जबाबदारी वाढली. मग डोक्यात एक आलं. आईपण किती महत्वाचा नाजूक विषय आहे? एक आईच असते जी पुरूषाला जन्म देते. तिच्या भावना या अथांग समुद्रासारख्या असतात. त्यातलं ओंजळभर पाणी या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांच्या चरणी वाहणार आहे. हा चित्रपट फक्त कुणा स्त्रीसाठी नाही. तर तो समस्त रसिकांसाठी असेल. कारण प्रत्येकाला आई असते.'

केदार शिंदेंनी पुढे सांगितले की, 'मी पुन्हा एकदा जिओ स्टुडिओजसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे. ज्यांनी बाईपण भारी देवासाठी माझ्या व्हिजनवर मला पाठिंबा दिला. आईपण भारी देवासोबत आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आणि चिरस्थायी प्रभाव टाकणारा चित्रपट देऊ अशी आशा करतो. अगं बाई अरेच्चा आणि बाईपण भारी देवानंतर केदार शिंदे आता घेऊन येत आहेत 'आईपण भारी देवा'. नावाप्रमाणेच हा विषय आईपण आणि तिच्याशी संबंधित असलेल्या आपल्या सगळ्यांचाच आहे असं म्हणता येईल. मात्र यावेळेस स्त्रियांची एक वेगळी बाजू असणार आहे. दरम्यान, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित, ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे यांच्या सह-निर्मीत 'आईपण भारी देवा' चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

SCROLL FOR NEXT