Viju Mane On Baipan Bhaari Deva Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viju Mane On Baipan Bhaari Deva: ‘खपतं ते विकावं...’ ‘बाईपण भारी देवा’ला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल विजू मानेंनी केली खास पोस्ट

Chetan Bodke

Viju Mane On Baipan Bhaari Deva Success Related Post: सध्या बॉक्स ऑफिसवर ‘बाईपण भारी देवा’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५४ कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

चित्रपटाचे कौतुक फक्त सेलिब्रिटीच नाही तर, चित्रपट समीक्षक देखील करीत आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी देखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. अशातच दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी नुकतंच ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या यशाबाबत एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

नुकतीच विजू माने यांनी सोशल मीडियावर चित्रपटाविषयी एक भली मोठी पोस्ट लिहिलीय. यामध्ये विजू माने म्हणतात, “मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकहो तुमचे मनापासून आभार... सध्या तिकीटबारी वर ‘बाईपण भारी देवा’ हा ‘भारीच’ जमून आलेल्या सिनेमा ‘भारी’ गर्दी जमवतो आहे. ज्याचा मला एक मराठी चित्रपटकर्ता म्हणून अभिमान आहेच. त्याबद्दल केदार शिंदे आणि त्याच्या टीमचं विशेषतः लेडीज ब्रिगेडचं मनापासून अभिनंदन. रसिक प्रेक्षकांना दूषणं देऊन काहीही होत नाही. ‘उत्तम सिनेमा’ हा एकमेव यशाचा मार्ग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठी लोक मराठी सिनेमांना गर्दी करत नाहीत याची कारणे मराठी सिने निर्माते आणि दिग्दर्शक यांनी शोधली आणि त्या बरहुकूम सिनेमे बनवले तर लोक गर्दी करतात हे आता दिसून आलं आहे.”

आपल्या पोस्टमध्ये विजू माने म्हणतात, “आत्ताच्या अंदाजानुसार तिकीट बारी वरील सर्वाधिक कमाईचा विक्रम सिनेमा करण्याची शक्यता आहे. मला याबाबतीत जिओचे निखिल साने यांचं कौतुक वाटतं. उगाचच कुणाच्यातरी पदरी देव अमाप यश टाकत नसतो. त्यामागे त्या व्यक्तीचा संशोधन, अनुभव आणि योग्य वेळ साधून करावयाच्या गोष्टी याचं कौशल्य अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मार्केटच्या स्वभावानुसार आता पुन्हा एकदा स्त्रियांवर आधारित सिनेमांची लाट येऊ शकेल. त्यात काही वावगं आहे असं मी म्हणणार नाही.”

पुढे दिग्दर्शक विजू माने म्हणाले, “कारण जे खपतं ते विकावं हा एक सामान्य बुद्धी असलेल्या व्यावसायिकाचा आडाखा असणारच. मुळात सिनेमा बनवताना कोणीही 'चला आज वाईट सिनेमा बनवूया' असं म्हणून सिनेमा बनवत नाही. पण चांगला सिनेमा बनवण्यासाठी केवळ 'मला ही गोष्ट फार आवडली, म्हणून मी हा सिनेमा केला' असे निर्माते नकोत. इतर व्यवसायांनी जसं सर्वे, प्रवाह आणि नेमका टार्गेट ऑडियन्स असा अभ्यास करून मग आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी आणण्याची वाट निवडली हीच पद्धत आता मराठी सिनेमांनी उत्तरोत्तर स्वीकारायला हवी.”

पोस्टच्या शेवटच्या भागात विजू माने म्हणाले, “आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थेटर मध्ये टाळ्या शिट्ट्या नाच करत सिनेमा एन्जॉय करण्याची ‘सवय’ लावायला हवी. आता यातही ‘प्रेक्षकानुनय केलेला सिनेमा’ ‘त्यात काय एवढं?’ ‘मला बाई फार नाही आवडला’ ‘आशयघनता कुठे आहे?’ ‘सिनेमात डेप्थ नाही’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतील, त्या असणारच. But nothing succeeds like success. ‘बाई पण भारी देवा’ च्या सगळ्या टीमला आणि त्या टीमला यश देणाऱ्या अख्या जगभरच्या रसिक प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मराठी चित्रपटांच्या नावानं चांगभलं.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT