Satarcha Salman Trailer Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Hemant Dhome: एका गाण्यासाठी घेतला दिग्दर्शकाने हटके निर्णय, हेमंत ढोमेने सांगितला ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा किस्सा

'सातारचा सलमान' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच दिग्दर्शकांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

Chetan Bodke

Sataarcha Salman: हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच हेमंत ढोमेने या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘सातारचा सलमान’ या गाण्याने प्रत्येकालाच ठेका धरायला लावले. एकंदरच रंगीबेरंगी वातावरण, आजूबाजूला पारंपरिक पोशाखात जल्लोषात नाचणारे गावकरी, सुयोगचा उत्स्फूर्त नाच आणि त्याला इतर कलाकारांनी दिलेली उत्तम साथ एकंदरच सगळं मस्त जुळून आले आहे.

हे गाणे चित्रित करण्यापूर्वी हेमंतच्या डोक्यात काही कल्पना होत्या. मुळात हे गाणे खूपच उत्स्फूर्त, जल्लोषमय असल्याने चित्रीकरणाचा परिसरही त्याला तसाच कलरफूल, उत्साहवर्धक हवा होता. या चित्रपटाचे बरेच चित्रीकरण हे साताऱ्यातील गावांमध्ये चित्रित झाल्याने तिथे रंगीबेरंगी घरे दिसण्याची तशी शक्यताच नव्हती. अखेर हेमंतने गावाच्या चौकातल्या सगळ्या घरांना वेगवेगळे रंग देण्याचे ठरवले आणि गंमत म्हणजे हेमंतच्या या निर्णयावर गावकऱ्यांनीही संमती दर्शवली.

अगदी गावकरी येऊन येऊन सांगत होते, माझ्या घराला हिरवा रंग द्या, पिवळा रंग द्या. अखेर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घरांना रंग दिला आणि हेमंतला जे अपेक्षित होते, ते गाण्यात उतरले. आजही साताऱ्यातील केंजळ या गावात गेल्यावर ही रंगीबेरंगी घरे पाहायला मिळतात.

या चित्रपटात मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, सुरेश पै सहनिर्मित, रिलायन्स एन्टरटेनमेंट प्रदर्शित 'सातारचा सलमान' हा चित्रपट येत्या ३ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT