Prajakt Deshmukh Car Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakt Deshmukh: नाशिक-मुंबई हायवेला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखने ट्विट करत केला संतप्त सवाल

हायवेवर अनेक गाड्या बेशिस्तपणे चालवत असल्याने याचा फटका सामान्य नागरिकांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींनाही बसत आहे.

Chetan Bodke

Prajakta Deshmukh: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गाड्यांच्या अपघाताचे सत्र सुरुच आहेत. अनेकदा सिटबेल्ट न लावल्यामुळे तर कित्येकदा गाडीचा स्पीड जास्त असल्याने गाड्यांचा अपघात होत आहे. सोबतच हायवेवर अनेक गाड्या बेशिस्तपणे चालवत असल्याने याचा फटका सामान्य नागरिकांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींनाही बसत आहे. आज सकाळी मराठी चित्रपट संवादलेखक प्राजक्त देशमुखने ट्वीट करत आपल्या गाडीला अपघात झाल्याची माहिती दिली आहे.

नेहमीच दिग्दर्शक आणि लेखक प्राजक्त देशमुख सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसोबत अनेकदा प्राजक्त देशमुख नाटकासंबंधीत माहिती शेअर करत असतो. सकाळीच प्राजक्तने आपल्या गाडीला अपघात झाल्याची बातमी शेअर केली आहे. प्राजक्तच्या गाडीला अपघात झाला असून तो सुखरुप बचावला असल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

ट्वीट करत प्राजक्त देशमुख म्हणतो, "नाशिक मुंबई हायवे वरुन धावणारे अवजड वाहने बेशिस्तीने चालतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेंटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे. परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लावत दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?" या अपघातानंतर पुन्हा एकदा रोड सेफ्टीचा गहन मुद्दा चर्चेत आला आहे.

गेल्या वर्षी अनेक दिग्गज मंडळींना रोड सेफ्टीमुळे आपला जीव गमवावा लागला होता. सोबतच अनेक सामान्य नागरिकांनाही अवजड वाहनांमुळे आपला जीव गमवावा लागतो. बेशिस्त पद्धतीने गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांवर आता तरी चाप बसेल का हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Department Recruitment: सार्वजनिक आरोग्य विभागात सर्वात मोठी भरती! १४४० पदांसाठी रिक्त जागा; पगार १.७७ लाख; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच खेडमध्ये जंगी स्वागत

IIT Research Diabetes : मधुमेहिंसाठी आशेचा किरण! किडणी विकाराचे आता लवकर निदान होणार | VIDEO

Comet AI ब्राउझरला धक्का! Amazon ने Perplexity ला फीचर थांबवण्याची दिली नोटीस

विरारचा प्रवास वेगात होणार, निवडणुकीआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, मुंबईसह पुण्यासाठी महत्त्वाची घोषणा

SCROLL FOR NEXT