Rinku Rajguru Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru: 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?', चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं रिंकु राजगुरूने दिलं उत्तर...

Rinku Rajguru Boyfriend Name: रिंकूची लाइफस्टाइल, तिची पर्सनल लाइफ याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. ते तिला सोशल मीडियावरच अनेक प्रश्न विचारताना दिसतात.

Priya More

Rinku Rajguru Answers Fans Questions:

मराठी चित्रपटसृष्टीची 'अर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. 'सैराट' चित्रपटाच्या (Sairat Movie) माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू आज आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. रिंकूची लाइफस्टाइल, तिची पर्सनल लाइफ याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. ते तिला सोशल मीडियावरच अनेक प्रश्न विचारताना दिसतात. अशामध्ये रिंकूने देखील आपल्या चाहत्यांना नाराज न करता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

रिंकू राजगुरूला तिच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर काही प्रश्न विचारले होते. हे प्रश्न रिंकूच्या पर्सनल लाइफशी संबंधित आहेत. रिंकूला तिच्या एका चाहत्याने 'तुझं टोपणनाव काय आहे?' असा प्रश्न विचारला होता. तर दुसऱ्या चाहत्याने 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?', असा प्रश्न विचारला होता. त्याचसोबत तुझा आवडता कलर कोणता?, तुला तेलुगू बोलायला आवडते का, रोज जिम करते का?, 'झिम्मा २' नंतर नवा प्रोजेक्ट कोणता?, आवडता मराठी गायक?, नवा प्रोजेक्ट कोणता?, आवडते जेवण?, वेट लॉसचे टिप्स? यासारखे अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले आहेत. आता रिंकू या प्रश्नांवर उत्तर देईल की नाही याबाबत तिच्या चाहत्यांना कल्पनाही नव्हती. पण तिने चाहत्यांना नाराज न करता इन्स्टाग्रामवरच त्याची उत्तरं दिली आहेत.

रिंकू राजगुरूने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर 'Ask me a Question' असे लिहित चाहत्यांनी तिला विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं तिने दिली आहेत. यामधील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा प्रश्न म्हणजे 'तुझं टोपणनाव काय आहे?' यावर रिंकूने उत्तर दिलं की प्रेरणा. त्याचसोबत 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?' हा देखील खूपच इंटरेस्टिंग प्रश्न होता. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. यावर उत्तर देताना रिंकूने सांगितले की, 'बॉयफ्रेंड नाहीये त्यामुळे नाव पण नाहीये.' तर, तुम्ही देखील रिंकूच्या इन्स्टा स्टोरीवर जाऊन तिने दिलेल्या प्रश्नांची उत्तरं वाचू शकता.

Rinku Rajguru Insta Post

दरम्यान,रिंकू राजगुरू नुकताच 'झिम्मा २' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे देखील खूपच कौतुक झाले. या चित्रपटात रिंकूसोबत सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग,सुचित्रा बांदेकर, सयाली संजीव आणि शिवानी सुर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. झिम्मा २ हा चित्रपट २०२३ मध्ये मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT