Siddharth- Mitali Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Chandekar: सिद्धार्थ, मिताली आणि सईचा 'कोंबडी पळाली 2.0' व्हिडीओ व्हायरल, पाहून पोटधरून हसाल

Siddharth_Mitali And Sai Kombadi Dance: सिद्धार्थ आणि मितालीने सई ताम्हणकरसोबत (Sai Tamhankar) एक भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून त्यांचे चाहते आणि नेटिझन्स पोट धरून हसत आहेत.

Priya More

Siddharth- Mitali Dance Video:

मराठी सिनेसृष्टीतील फेमस आणि सर्वांचे आवडते कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमी नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात. महत्वाचे म्हणजे हे कपल सोशल मीडियावरील ट्रेंड नेहमी फॉलो करतात. त्यावर जबरदस्त रील्स तयार करून ते पोस्ट करत असतात. नुकताच सिद्धार्थ आणि मितालीने सई ताम्हणकरसोबत (Sai Tamhankar) एक भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून त्यांचे चाहते आणि नेटिझन्स पोट धरून हसत आहेत.

मिताली मयेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा कोंबडी डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. मितालीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'कोंबडी पार्टी' असे लिहिले आहे. 'Me Miro y La Mire' या हिट गाण्यावर त्यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये एका फ्रेममध्ये तीन कोंबड्या दिसत आहेत. त्यांच्या स्टाइलमध्येच मिताली, सिद्धार्थ आणि सईने डान्स केला आहे. त्यांची हेअरस्टाईल तर खूपच जबरदस्त आहे. त्यांनी या तिन्ही कोंबड्यांसारखे एक्स्प्रेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. तिघांचे देखील लूक पाहण्यासारखे आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याला 'कोंबडी पळाली 2.O' असं नाव दिलं आहे.

हा व्हिडीओ पाहून फक्त नेटिझन्स नाही तर मराठी सेलिब्रिटी देखील पोट धरून हसत आहेत. यावर 'कोंबडी पळाली' फेम अभिनेत्री क्रांती रेडकरने हसण्याचा इमोजी शेअर करत अशक्य असं लिहिलं आहे. तर यावर प्रिया बापट, मधुराणी प्रभूलकर, सुव्रत जोशी, राधा सागर, समृद्धी केळकर, अमृता खानविलकर या अभिनेत्रींनी हसण्याचे इमोजी कमेंट्समध्ये पोस्ट केले आहेत. मिताली मयेकरच्या या पोस्टला १ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा नुकताच 'झिम्मा २' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. आता सिद्धार्थ लवकरच 'ओले आले' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सिद्धार्थ आणि सई हे खूपच चांगले फ्रेंड आहेत. या दोघांनी 'वजनदार' आणि 'क्लासमेट' चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT