Dance Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dance Video: 'लल्लाटी भंडार…' गाण्यावर मराठमोळ्या जोडप्यानं केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Aishwarya-Avinash Narkar Dance Video : मराठी मनोरंजनसृष्टीतील पावर कपल म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे आहेत. ते आपल्या डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.

Shreya Maskar

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कपल आहेत जे खूप खास आहेत. असंच एक जोडपं जे कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. त्यांचे डान्स व्हिडिओ पाहून तरुण पिढीही लाजेल एवढी एनर्जी त्यांच्यात असते. हे जोडप दुसर तिसरं कोणी नसून मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे आहेत. सोशल मीडियावर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ते कायमच आपल्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात.

ऐश्वर्या आणि अविनाश हे दोघेही ट्रेंडिंग आणि लोकप्रिय गाण्यांवर रील्स बनवतात. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातील एक म्हणजे त्यांनी घातला देवीचा जागर. सध्या त्यांचा 'लल्लाटी भंडार' या गाण्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोगवा' या चित्रपटाचे हे गाणे आहे. या जोडप्यांचा या भन्नाट डान्समुळे चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर लाखात व्ह्यूज आहेत. तर असंख्य कमेंट्स आणि लाईक्स पाहायला मिळत आहेत.

'लल्लाटी भंडार' या गाण्याच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. नारकर जोडप्याच्या एनर्जीचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसाठी दोघांनीही पारंपारिक पोषाख केला आहे. अभिनेते अविनाश यांनी धोतर नेसलं आहे तर अभिनेत्री ऐश्वर्या यांनी साडी नेसली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT