Neena Kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neena Kulkarni: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाची अफवा, स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मी जिवंत...'

Neena Kulkarni Post: सध्या सोशल मिडियावर नीना कुलकर्णी यांनी एक पोस्ट केली आहे. जी लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नीना कुलकर्णी. मराठीसह हिंदी मालिकाविश्वात नीना कुलकर्णी यांनी अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या सोशल मिडियावर नीना कुलकर्णी यांनी एक पोस्ट केली आहे. जी लक्ष वेधून घेत आहे. नीना कुलकर्णी यांनी मी जिवंत आहे अशी पोस्ट केली आहे. नेमकं यामागचं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या निधनाची अफवा पसरली होती. या खोट्या पसरणाऱ्या अफवांवर नीना कुलकर्णी या भडकल्या आहेत. सोशल मीडियावर नीना कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर केली आहे. "यूट्यूबरवर माझ्या निधनाची खोटी बातमी दाखवली जात आहे. देवाच्या कृपेने मी जिवंत आहे आणि पूर्णपणे ठणठणीत असून कामामध्ये व्यस्त आहे. कृपया अशाप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांना प्रोत्साहनही देऊ नका. मला दीर्घायुष्य मिळू दे".

नीना कुलकर्णी यांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर नीना कुलकर्णी सक्रिय असतात. सोशल मीडियावर नीना कुलकर्णी त्याचे फोटो पोस्ट करतात. ६८ वर्षीय नीना कुलकर्णी आजही फिट अॅन्ड फाईन आहेत. मात्र अलिकडेच सुरू असलेल्या त्यांच्या निधनाच्या चर्चांमुळे नीना कुलकर्णी यांचे चाहते देखील चिंतेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT