Bigg Boss Marathi 5 Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : 'सुख म्हणजे...' मालिका फेम अभिनेत्री करणार बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश ?

Bigg Boss Marathi 5 Latest Update : 'बिग बॉस मराठी ५' हा टीव्ही रिॲलिटी शो येत्या २८ जुलैपासून सुरू होत आहे. या शोमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

Chetan Bodke

येत्या २८ जुलैपासून 'बिग बॉस मराठी ५' हा टीव्ही रिॲलिटी शो सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'बिग बॉस मराठी ५'मध्ये कोण कोणते कलाकार दिसणार? याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अशातच बिग बॉस मराठीबद्दल अपडेट देणाऱ्या एका इन्स्टा पेजने एका स्पर्धकाचे नावाची माहिती दिली आहे.

'बिग बॉस मराठी ५'ने दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस मराठी ५'मध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर दिसणार अशी चर्चा सुरू आहे. वर्षा उसगांवकर नुकत्याच स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या शोमधून बाहेर पडल्या आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी माईचं पात्र साकारलं होतं. मालिका सुरू झाल्यापासून वर्षा उसगांवकर ह्याच प्रमुख भूमिका साकारत होत्या. आता खरोखरंच वर्षा उसगांवकर 'बिग बॉस मराठी ५'मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार का ? याचं उत्तर आपल्याला लवकरच कळेल.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये अंकिता प्रभु वालावलकर, विवेक सांगळे, जान्हवी किलेकर, चेतन वढनेरे आणि हार्दिक जोशी हे स्पर्धक दिसण्याची शक्यता आहे. या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक दिसणार याचे उत्तर प्रेक्षकांना २८ जुलैला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी ५'चा दिमाखदार प्रीमियर २८ जुलैला रात्री ९:३० वाजता पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT