ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वर्षा उसगांवकर ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे.
गंमत जंमत नंतर खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस, लपंडाव यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले.
वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून अभिनयास प्रारंभ केला.
वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.
वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.
वर्षा उसगांवकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता 'गंमत-जंमत'.
गंमत जंमत हा चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली.