Titeeksha Tawde And Siddharth Bodke Saam Tv
मनोरंजन बातम्या

Titeeksha Tawde: ठरलं तर मग! अभिनेत्री तितीक्षा तावडे 'दृश्यम 2' फेम अभिनेत्यासोबत अडकणार विवाहबंधनात

Titeeksha Tawde And Siddharth Bodke: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न करणार आहे.

Priya More

Titeeksha Tawde Wedding:

मराठी मनोरंजनसृष्टीतील एकापोठापाठ एक सेलिब्रिटीं लग्न करत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे. नुकताच शिवानी सुर्वेने अजिंक्य ननावरेसोबत लग्न केले. आता शिवानी पाठोपाठ आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न करणार आहे.

तितीक्षा तावडेने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो पोस्ट करत लग्नाबाबतची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तितीक्षा लग्न करणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तितीक्षाने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. दोघेही एकमेकांकडे पाहून गोंडस स्माइल देताना दिसत आहेत. सिद्धार्थसोबतचा हा फोटो शेअर करत तितीक्षाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'He asked me out on a date, it turned out to be a केळवण.' तितीक्षाने या पोस्टसोबत रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे.

तितीक्षा आणि सिद्धार्थच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. पण त्यांचे लग्न कधी होणार याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. तितीक्षाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून ते दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तितीक्षाची मैत्रिण आणि अभिनेत्री भक्ती रत्नपारखीने कमेंट्समध्ये लिहिले की, 'कधीपासून याची वाट पाहत होते.' तिच्या चाहत्याने कमेंट्स करत लिहिले की, 'तरी बरका मला शंका होतीच.'

तितीक्षा आणि सिद्धार्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करत होते. पण त्यांनी कधीच आपल्या नात्याची माहिती उघडपणे सांगितली नाही. आता या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली असून दोघेही लग्न करणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री खूपच जुनी आहे. २०१५ साली ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका हे दोघेजण साकारत होतो. त्या मालिकेपासूनच त्यांची मैत्री आहे. अखेर तितीक्षाने आपल्या मित्राचीच निवड खऱ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून केली आहे.

सिद्धार्थ आणि तितीक्षा यांची जोडी प्रेक्षकांच्या सुरुवातीपासूनच आवडते. सिद्धार्थ आणि तितीक्षाने झी मराठीवरील 'तू अशी जवळी राहा' मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २०१८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेने सर्वांचे मन जिंकले होते. या मालिकेमध्ये तितीक्षाने मनवाची तर सिद्धार्थने राजवीरची भूमिका साकारली होती. आता या रिल लाइफ कपलने रिअल लाइफमध्ये देखील एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केले आहे. दरम्यान, तितीक्षा तावडे सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत काम करत आहे. तर सिद्धार्थ बोडके नुकताच 'दृश्यम २' चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT