राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मागील ४ दिवस उपोषण केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत सरकारला इशारा दिला.
या टोलच्या मुद्द्यावरून आता अनेकांनी प्रतिक्रिया देत मनसेला पाठिंबा देण्यास सुरूवात केली आहे. मराठमोळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नुकताच तेजस्वी पंडितने एक्स म्हणजेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून तेजस्वीने टोलवाढीच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत मनसेला पाठिंबा दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात देवेंद्र फडणवीस पत्रकरांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांना टोल मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी सांगितले की, 'असं आहे की जी गोष्ट आम्ही त्या (शिवसेना-भाजप युती) वेळेस केली होती. राज्यातील सर्व टोलवर जे फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही टोलमुक्ती दिली होती. फक्त कमर्शियल-मोठ्या वाहनांचे टोल आपण महाराष्ट्राच्या टोलवर घेत आहोत.'
या व्हिडीओ एक्सवर शेअर करत तेजस्वीनी पंडितने असे म्हटले आहे की, 'म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! "माननीय उपमुख्यमंत्री" असे विधान कसे असू शकता? अविश्वसनीय तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा.' असं लिहित तिने मनसेला पाठिंबा दिला.
याआधीही अनेक मराठी कलाकारांनी टोल वाढीवर आपले मत मांडले होते. मध्यंतरी अभिनेत्री ऋतुजा देशमुखनेही मुंबई -पुणे महामार्गावरील टोल प्रकरणी व्हिडीओ शेअर केला होता. तिने पुण्याला जाताना लोणावळ्याला थांबल्यावर पुन्हा एकदा टोल आकारला गेल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अनेक कलाकारांनी या टोल प्रकरणावर आपले मत मांडले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.