Tejashri Pradhan Mother Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhan Mother Death : तेजश्री प्रधानला मातृशोक, अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

Tejashri Pradhan News : तेजश्री प्रधानला मातृशोक, अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

Satish Kengar

Tejashri Pradhan Mother Death:

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या आईचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेजश्रीच्या आईचं नाव सीमा प्रधान असं असून मुंबई येथील राहत्या घरी त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमा प्रधान यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या. त्यांना नेमका काय आजार होता, हे अद्याप समजू शकलेलं नाही. आईच्या जाण्याने तेजश्रीला मोठा धक्का बसला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीमा प्रधान यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तेजश्री अनेक चाहत्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करुन तिचे सात्वंन केले. तसेच अनेक मराठी सेलिब्रेटींनीही शोक व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)

तेजश्रीचं तिच्या आईवर खूप प्रेम आहे. कुठेही जायचं झाल्यास ती अनेकवेळा आपल्या आईला सोबत घेऊन जात होती. दरम्यान, तेजश्री प्रधानने अनेक मराठी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलं आहे. झी मराठी टेलिव्हिजन मालिका अग्गाबाई सासूबाई (2019) आणि होनार सुन मी या घरची (2013) मधून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२००० पदांसाठी भरती; अट फक्त १० वी पास; अर्ज कसा करावा?

Mehandi Designs: नवरीच्या पायावर मेहंदी का काढतात?

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Gautami Patil : मोकळे केस, काळा गॉगल; अक्षय खन्नाच्या गाण्यावर गौतमी पाटीलनं लगावले ठुमके, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT