Swanandi And Ashish Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swanandi And Ashish Wedding: आयुष्यभराची आनंदी साथ! धुमधडाक्यात पार पडला स्वानंदी- आशिषचा विवाहसोहळा

Swanandi Tikekar Married With Ashish Kulkarni: स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियावर लग्नातील फोटो (Swanandi And Ashish Wedding) शेअर करत ही आनंदाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

Priya More

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni:

मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरत आहे. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्न उरकत आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली. मुग्धा- प्रथमेश यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केले. २५ डिसेंबरला गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरने लग्न केले. त्यांच्या पाठोपाठ याच दिवशी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) हे विवाहबंधनात अडकले. स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियावर लग्नातील फोटो (Swanandi And Ashish Wedding) शेअर करत ही आनंदाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटर लग्नातील काही सुंदर क्षणांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी सुंदर कॅप्शन दिले आहे. 'आयुष्यभराची आनंदी साथ...', असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आशिषने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोना मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी असे कॅप्शन दिले आहे. त्याने हॅशटॅगमध्ये आनंदी असे लिहिले आहे. आशिष आणि स्वानंदीच्या लग्नाच्या फोटोंना सर्वांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. सर्वजण या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना भावी आयु्ष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

स्वानंदी आणि आशिष लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. स्वानंदीने लग्नामध्ये येलो कलरची साडी नेसली होती. तर आशिषने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. या कपलने आणखी एक पोस्ट केली आहे. यामध्ये स्वानंदीने पर्पल कलरची नववारी साडी नेसली आहे. आशिषने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि स्वानंदीच्या साडीच्या कलरचे धोतर नेसले होते. या फोटोमध्ये हे कपल खूपच आनंदी दिसत आहेत.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने २० जुलैला रिलेशनशीपमध्ये असल्याची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी स्वानंदीने आशिषसोबतचे साखरपुडा केल्याचे काही फोटो शेअर केले होते. हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते याबाबत कोणालाही माहिती नव्हते. अचानक त्यांचा साखपुड्याचे फोटो पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते. अखेर २५ डिसेंबर रोजी त्यांनी लग्न केले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या विधीचे म्हणजेच संगीत, मेहेंदी सीरेमनीचे फोटो व्हायरल झाले होते.

स्वानंदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी स्वानंदीने ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?’ या मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. स्वानंदी सिनेअभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे. स्वानंदी आणि आशिष यांची जोडी जुळण्यामागचे कारण म्हणजे संगीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT