Sonalee Kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaikottai Vaaliban Movie: सोनाली कुलकर्णीच्या 'मलाइकोट्टाई वालिबान' मधील गाणं रिलीज, अभिनेत्रीच्या दिलखेच अदांनी वेधलं सर्वांचं लक्ष

Sonalee Kulkarni Song: सोनाली कुलकर्णीने मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये एन्ट्री केली आहे. ती 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटातील सोनालीचं गाणं प्रदर्शित झालं आहे.

Priya More

Malaikottai Vaaliban Movie New Song:

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या चर्चेत आले. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. सोनाली कुलकर्णीने मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये एन्ट्री केली आहे. ती 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटातील सोनालीचं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील सोनाली कुलकर्णीचे 'इझिमाला कोट्टाइले' (Ezhimala Kottayile) हे गाणं आज रिलीज झालं.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णीने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटामध्ये सोनालीने साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटातील सोनालीचे 'इझिमाला कोट्टाइले' हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्याला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. या गाण्याला ६ तासांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातील फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे.

या चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ केले आहे. महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार असल्याचे दिसून येत आहे. सोनाली कुलकर्णीचा हा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. सोनाली कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. तिचे नवनवीन लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनाली कुलकर्णीचा पहिलाच मल्याळम चित्रपट 'मलाइकोट्टाई वालिबान' येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला तामिळ, तेलुगू, कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट या आठवड्यामध्ये हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT