Sonali Kulkarni Gave A Bitter Reply To The Trolls Instagram
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni On Trollers: ‘ट्रोलर्स म्हणजे शेजारील काकू आणि मावशी...’ म्हणत सोनालीने ट्रोलर्सला खडेबोल सुनावले

Sonalee Kulkarni Talk About Social Media Trollers: नुकतंच सोनालीने एका मुलाखतीत ट्रोलर्सला बरेच खडेबोल सुनावले असून यावेळी तिने मुलाखतीत ट्रोलिंगकडे फार लक्ष देत नाही, असं भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Sonali Kulkarni Gave A Bitter Reply To The Trolls: अनेक सेलिब्रिटी आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांनी केलेली फॅशन त्यांच्या अंगलट येते तर कधी त्यांची चर्चा होते. अशातच एका मराठी सेलिब्रिटीच्या फॅशनची नेहमी सोशल मीडियावर चर्चा होते.ती म्हणजे, सोनाली कुलकर्णी. सोनाली सोशल मीडियावर अनेकदा आपल्या खास अंदातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. तिच्या फॅशनमुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतंच तिने एका मुलाखतीत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहे.

सध्या सोनाली तिच्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. सोनाली लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटामुळे ती बरीच चर्चेत आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या सोनालीने नुकतंच एक फोटोशूट केलं होतं. त्यावरून देखील ती बरीच ट्रोल झाली होती. नुकतंच तिने ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सला बरेच खडेबोल सुनावले आहे. मुलाखतीत तिने ट्रोलिंगकडे फार लक्ष देत नाही, असं भाष्य केलं आहे.

यावेळी ती मुलाखतीत म्हणते, “सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगकडे मी फार लक्ष देत नाही. सोशल मीडियावरचं ट्रोलिंग म्हणजे आपल्या इमारतीमधील काकू व मावशी यांच्यासारखं आहे.आपल्या बद्दल लोकं काय बोलतात हे मला वाचायला सहसा फार मज्जा वाटते. पण नंतर या गोष्टीचाच मला त्रास होऊ लागला. अनेकांची स्वत:ला साधी ओळख देखील नाही. समोर येऊन बोलायला त्यांच्यात साधी हिंम्मत ही नाही. ज्यांच्याकडे फार वेळ आहे, ते लोकं हे काम करतात.”

सोनाली इतक्यावरच गप्प नाही बसली, तर ती पुढे म्हणते, “प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तरं जर मी देत गेले तर, मला काम सोडून घरीच बसावं लागेल. सोशल मीडियाचे फायदे- तोटे दोन्हीही आहेत. पण आमच्यासाठी सोशल मीडिया हे फार फायदेशीर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे. लोकांना मराठी अभिनेत्री कोण आहेत याची साधी माहिती देखील नव्हती. सोशल मीडियामुळे लोकांना साधी याची माहिती मिळाली. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे सशक्त माध्यम असून सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे कळलं की त्रास होत नाही.” सोनालीने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT