Shreya Bugde New Serial
Shreya Bugde New Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreya Bugde New Serial: 'ड्रामा' करायला श्रेया झालीये तयार! कॉमेडी क्वीन करणार नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छोट्या पडद्यावरील श्रेया बुगडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रेया बुगडे नेहमीच आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकत असते. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या मालिकेत सुरुवातीला श्रेया ही एकटी स्त्री कलाकार होती. मालिका बंद झाल्यानंतर मालिकेतील इतर कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, श्रेया बुगडे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही मालिकेत दिसली नव्हती. परंतु श्रेया आता लवकरच नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

श्रेयासोबतच अमृता खानविलकर, संकर्षण कऱ्हाडेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमात हे तिन्ही कलाकार दिसणार आहेत. झी मराठीवर मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यात अमृता आणि संकर्षणचे अपहरण करण्यात आले आहे. अमृता आणि संकर्षणला एका खोलीत बंद करुन ठेवलेले दिसत आहे. त्यानंतर अनेक लहान मुले येऊन त्यांच्याभोवती आरडाओरडा करताना दिसत आहे. त्यात लहान मुलांनी वेगवेगळ्या चित्रपटातील पात्रांची नक्कल केली आहे. त्यानंतर अमृता घाबरुन पाणी मागते. तेव्हा श्रेया बुगडे पाण्याचा ग्लास घेऊन येते.

श्रेयालादेखील तिथे पाहून अमृता आणि संकर्षणला आश्चर्याचा धक्का बसतो. या प्रोमोत लहान मुले त्यांच्या परिक्षकाला शोधताना दिसत आहे. तेव्हा अमृता आणि संकर्षणने परिक्षक व्हावे असं लहान मुले मागणी करतात.

झी मराठीवरील या कार्यक्रमाचे नाव 'ड्रामा ज्युनिअर्स' आहे. या कार्यक्रमात लहान मुले त्यांचे परफॉर्मन्स सादर करणार आहेत. हे सादरीकरणाचे संकर्षण आणि अमृता परिक्षण करणार आहे. तर श्रेया बुगडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election : मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

Diabetes Health: मधुमेहींनो, आहारात हे ५ पदार्थ खा, साखर नियंत्रणात राहिल

Atal Seva Kendra Bharti 2024: 12 वी झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी,अर्ज करण्यासाठी उरले अवघे काही दिवस

Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर

Maharashtra Live News Updates : मागासवर्गीय समाजांची मते वळवण्यासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरु

SCROLL FOR NEXT