Pani Puri  canva
मनोरंजन बातम्या

Pani-puri: सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ या दिवशी होणार रिलीज

Pani-puri Movie: ‘पाणीपुरी’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Manasvi Choudhary

चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं 'युएसपी' असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघर, बिनधास्त आणि मिश्किल स्वभावाने आपली प्रत्येक भूमिका गाजवणारे ऋषिकेश जोशी त्यांच्या जोडीला ब्युटीफुल अभिनेत्री प्रतीक्षा जाधव सोबत सचिन बांगर-अनुष्का पिंपूटकर हे दोन नवे तरुण चेहरे यात धमाल करणार आहेत. या जोड्यांच्या सोबतीला अभिनेता मकरंद देशपांडे, सायली संजीव, विशाखा सुभेदार हे अनुभवी कलाकार कथेत जबरदस्त रंग भरणार आहेत.

एस.के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजक ठरेल. ‘पाणीपुरी’ चित्रपटाचा मजेशीर टिझर नुकताच प्रदर्शित झाला. नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत या जोड्यांच्या प्रेमाची परिणीती, त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा म्हणजे ‘पाणीपुरी’ चित्रपट.

आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं एकत्र असणं ही देखील सहजीवनाची गरज असते. सहजीवनाची ही गंमत उलगडणारा ‘लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट’ सांगणारा ‘पाणीपुरी’ चित्रपट आपलं मनोरंजन नक्की करणार आहे. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

Armaan Malik: युट्युबर अरमान मलिकने केलं चौथं लग्न? करवा चौथच्या त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

SCROLL FOR NEXT